अनुपस्थित खासदारांचा मोदी घेणार तास?

अनुपस्थित खासदारांचा मोदी घेणार तास?

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला विविध विधेयके पारित करून घ्यायची आहेत. अशा वेळेस भाजपा खासदारांच्या चुकीमुळे मोदींनी संताप व्यक्त केला आहे.

संसदेच्या सध्या चालू असलेल्या अधिवेशनात काही खासदारांनी राज्यसभेत दांडी मारली होती. ज्यावेळेस ट्रिब्युनल अमेंडमेंट बिल २०२१ पारित करून घ्यायचे होते, त्यावेळेस खासदारांच्या अनुपस्थितीची नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांना संसदेच्या दोन्ही सभागृहात अनुपस्थित राहणाऱ्या खासदारांची यादी बनविण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपा खासदारांना राज्यसभेत ट्रिब्युनल अमेंडमेंट बिल पारित करून घेण्यासाठी उपस्थित राहण्यासाठी सक्ती करत आहे. त्यासाठी भाजपाकडून खासदारांवर व्हिप बजावला गेला आहे.
भाजपाकडून व्हिप बजावण्यामागे विविध विधेयके पारित करून घेण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये १२७ वी घटना दुरूस्तीचा देखील समावेश आहे. त्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश सभासदांची उपस्थिती अनिवार्य आहे.

हे ही वाचा:

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

अमरिंदर सिंग-अमित शहा भेटीने राजकीय चर्चांना उधाण

टाटा समुह विस्तारामध्ये पैसे ओतणार

औरंगाबादमधील उद्योगांवर ‘गुंडां’तर

दरम्यान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. त्यांनी संसदीय पक्ष भेटीमध्ये खासदारांना खेळाला उत्तेजन देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यांच्यासोबत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी टोक्यो येथे गेलेल्या भारतीय ऑलिम्पिक संचाच्या उपलब्धिंविषयी या सभेमध्ये सर्व सभासदांना माहिती दिल्याचे समोर आले आहे.

Exit mobile version