मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

मोदी सरकारकडून देशातील गरीबांना मिळणार मोफत धान्य

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने एक मोठा निर्णय घेत देशातील गरीब जनतेला दिलासा दिला आहे. मे आणि जून महिन्यात देशातील गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत मोफत धान्य देण्यात येणार आहे. या योजनेचे देशभरात ८० कोटी लाभार्थी असून या साऱ्यांनाच मे आणि जून महिन्यात या मोफत धान्याचा लाभ घेता येणार आहे.

देशात सध्या कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. देशातल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक लाखोने वाढ होत आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये तर राज्य सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत देशातील अनेक गरीब लोकांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे. अशात हातावर पोट असणाऱ्या अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला आहे. पण हा प्रश्न सोडवण्यासाठी थेट मोदी सरकारनेच मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा:

फ्रान्स भारताच्या पाठिशी सहाय्य करण्यासाठी ठामपणे उभा

पंतप्रधानांनी केजरीवालना खडसावले, शिष्टाचार मोडू नका!

देशवासीयांचे ‘प्राण’ वाचवायला भारतीय हवाईदल झेपावले

‘राजेश टोपे यांचे वक्तव्य असंवेदनशील’

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत देशातील गोरगरीब जनतेला मे आणि जून महिन्यात मोफत धान्य दिले जाणार आहे. शुक्रवार, २३ एप्रिल रोजी केंद्र सरकारने या संबंधीचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार गरीब कल्याण ऍन योजने अंतर्गत गरिबांना ५ किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. ह्या योजनेचा लाभ देशातील ८० कोटी जनतेला होणार आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून एकूण २६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Exit mobile version