बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट

बांग्लादेशमधील हिंदू भाविकांना मोदी सरकारची अनोखी भेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या दोन दिवसांच्या बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा एक भाग म्हणून मोदींनी शनिवारी बांग्लादेशमधील दोन मंदिरांना भेट दिली. यावेळी पंतप्रधान मोदींनी बांग्लादेशमधील हिंदू भाविकांसाठी एक खुशखबर दिली. या हिंदू भाविकांसाठी भारत सरकार एक अनोखी भेट देणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी जाहीर केले.

आपल्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओरकांडी मंदिर आणि जेशोरेश्वरी मंदिर या दोन मंदिरांचे दर्शन घेतले. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर बांग्लादेश सरकारने या दोन्ही मंदिरांचा जिर्णोद्धार केला आहे. यातील काशीनी उपजिल्ह्यातील ओरकांडी मंदिर हे मथुआ समाजाचे आराध्य दैवत आहे.

तर सतखिरा जिल्ह्यातील ईश्वरीपूर येथील जेशोरेश्वरी हे काली मातेचे मंदिर हे पवित्र अशा एक्कावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. कालीमातेचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी माध्यमांशी संवाद साधला आणि प्रतिक्रिया देताना बांग्लादेशमधील हिंदू भाविकांसाठी एक विशेष घोषणा केली.

हे ही वाचा:

ड्रीम मॉल आगीच्या प्रकरणात गुन्हा दाखल

कोविडपासून लसीची सुरक्षा लहानग्यांनाही मिळणार?

मोदींच्या बांग्लादेश दौऱ्यामुळे झाला दोन मंदिरांचा जिर्णोद्धार

जेशोरेश्वरी या पवित्र आणि जागृत अशा देवस्थानी पंतप्रधान मोदींनी विश्वशांतीसाठी आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. सध्या सारे जग हे कोविड महामारीच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून जगाला वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी माँ कालीच्या चरणी प्रार्थना केली. जेशोरेश्वरी मंदिरात जेव्हा माँ कालीचा मेळा लागतो तेव्हा इथे हजारो भाविक येतात. अनेक भाविक हे सीमा पार करून येतात. त्यामुळे या ठिकाणी एका बहुउद्देशीय सभागृहाची आवश्यकता आहे असे मोदी म्हणाले. त्यामुळे जेव्हा काली पूजेसाठी लोकं येतील तेव्हा त्यांना हा वापरता येईल.इकडच्या स्थानिक नागरिकांना सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमांसाठी या सभागृहाचा वापर करता येईल. सगळ्यात महत्वाचे म्हणेज एखाद्या आपत्तीच्या वेळी इथल्या स्थानिक नागरिकांना या सभागृहाचा वापर करता येईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. भारत सरकार हे बहुउद्देशीय सभागृह बांधून देईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली.

Exit mobile version