पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुपडा साफ केला आहे. पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. उपमुख्यमंत्री, पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. या यादीत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला आहे.
चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह उगाके यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. तर चमकौर साहिब मतदारसंघातून डॉक्टर चरणजीत सिंह यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव केला आहे.
भदौर मतदारसंघातून जे लाभ सिंघ जिंकले आहेत ते फक्त १२ वी पास आहेत. आणि ते मोबाईल रिपेअरचे काम करतात. त्यांचे वडिल ड्रायव्हर आहेत. तर आई स्वीपर आहे. २०१३ पासून सिंग हे आप पक्षात आहेत. विजयानंतर लाभ सिंह उगाके म्हणाले की, ‘ चरणजीत चन्नी यांना भदौर मतदारसंघाबाबत काहीही माहिती नाही. या मतदारसंघात ७४ गावे येतात. या गावातील सर्व अडचणी मला माहित आहे. ही सर्व गाव माझा परिवार आहेत. चन्नी यांना भदौर मतदार संघातील दहा गावांची नावेही माहित नाहीत. भदौर चन्नी यांच्यासाठी फक्त एक मतदारसंघ आहे.’
त्याशिवाय चमकौर साहिब या मतदार संघातूनही चन्नी यांना पराभव पत्करावा लागला आहे. चरणजीत सिंह चन्नी यांना डॉक्टर चरणजीत सिंह यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला आहे. २०१७ मध्ये मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी डॉक्टर चरणजीत सिंह यांना १२ हजार ३०८ मतांनी हरवले होते. याचाच बदला या निवडणुकीत डॉक्टर चरणजीत सिंह यांनी मुख्यमंत्री चन्नी यांचा घेतला आहे.
हे ही वाचा:
शिवसेनेच्या हाती फक्त फिश करी राईस!
गोव्यातील भाजपाच्या यशाचे श्रेय जनतेचे
देवभूमीत ऐतिहासिक निकाल! पुन्हा भाजपाच
गोव्यात भाजपाच्या सरकार स्थापनेच्या हालचाली; १४ मार्चला शपथविधी?
पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. मुख्यमंत्री चन्नीनसोबत पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी, पंजाब कांग्रेस अध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे.