मुलगा ऑनलाईन क्लास अटेंड करत असताना अचानकच मोबाईलचा स्फोट होऊन १५ वर्षांचा मुलगा जखमी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या स्फोटात आठवीत शिकणारा हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे . मध्य प्रदेशच्या सटणापासून ३५ किलोमीटर दूर असलेल्या एका छोटाशा गावात ही घटना घडली आहे. दरम्यान, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा या मुलाच्या घरी इतर कुणीही नव्हतं. मुलाचे आईवडील घरी नसल्यानं स्फोटाचा आवाज झाल्यानंतर शेजाऱ्यांचीही एकच पळापळ झाली. भयभीत झालेल्या शेजाऱ्यांना जेव्हा मोबाईलचा स्फोट झाल्याचं कळलं, त्यानंतर त्यांनी मुलाला लगेचच वैद्यकीय उपचारांसाठी दवाखान्यात नेलं.
रामप्रकाश भदौरीया असं जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे. रामप्रकाशच्या घरातील सर्वजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना रामप्रकाशच्या आईवडिलांना नंतर कळवण्यात आली. ऑनलाईन क्लासदरम्यान घडलेल्या या घटनेनंतर रामप्रकाशच्या पालकांनाही धक्काच बसला. त्यांनीही तत्काळ रुग्णालयात धाव घेतली. सुरुवातील रामप्रकाश भदौरीया याला सटणामधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, नंतर पुढील उपचारांसाठी त्याला जबलपूरच्या रुग्णालायत नेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मोबाईलचा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र मोबाईलची बॅटरी ओव्हरचार्ज झाल्यानं किंवा मोबाईल फोन गरम झाल्यामुळे त्याला स्फोट झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातोय.
हे ही वाचा:
विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर ठाकरे सरकारचा घाला
चक्क सापाला हातात धरून मारल्या दोरीउड्या
केरळमधील शाळेत मुलं- मुली वापरणार सारखाच गणवेश
नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपाचा एकतर्फी विजयी
सध्या मोबाईलचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांचाही ऑनलाईन क्लासेसच्या निमित्ताने मोबाईलचा वापर वाढलाय. अशात मध्य प्रदेशात घडलेल्या घटनेनं ऑनलाईन क्लासदरम्यान मुलांना मोबाईल वापरायला देताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याचंही महत्त्व अधोरेखित केलंय. मोबाईल स्फोटासारख्या घटना टाळण्यासाठी काळजी घेतना खालील गोष्टी केल्यास धोका टाळता येणं सहज शक्य आहे.