मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….

मालवणीत मध्यरात्री घरासमोर येऊन जिहादी टोळके म्हणाले, रोहनला आमच्या ताब्यात द्या….

मालवणीतल्या हिंदूंना धमकावण्याचे प्रकार सुरूच आहेत. मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्समध्ये अशा घटना सातत्याने घडतायत. २३ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता एका तरुणाच्या घरासमोर हल्लेखोरांचा जमाव आला. इमारतीखालीही टोळके उभे होते. ज्या तरुणाच्या शोधात हे टोळके आले होते तो सुदैवाने त्यांच्या हाती लागला नाही. जर लागला असता तर  दिल्लीतील रिंकू शर्मा या तरुणाच्या हत्येची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता होती. मालवणी पोलिस अशा घटनांबाबत सतत मवाळ भूमिका घेत असल्यामुळे इथे एखादे मॉब लिंचिंग होईपर्यत पोलिस बघ्याची भूमिका घेणार आहेत काय असा सवाल निर्माण झाला आहे.

गेल्या काही वर्षात मालवणीतला हिंदू टक्का झपाट्याने घसरतोय. मुस्लिमांची संख्या प्रचंड वाढली आहे. दहशतीमुळे हिंदू इथून काढता पाय घेतायत. एकेकाळी हिंदूबहुल असणाऱ्या छेडा कॉम्प्लेक्स मध्ये आज काही मोजकी हिंदू कुटूंब उरली आहेत. त्यातील एका कुटूंबातील रोहन नावाचा (नाव बदलले आहे) तरुण २३ फेब्रुवारीच्या रात्री घरगुती कामानिमित्त बाहेर पडला. तेव्हा परत येताना ईमारतीखाली असलेल्या ‘शांतीप्रिय’ समुदायातील टोळक्याशी  शाब्दिक चकमक झाली.

वाद टाळून तो घरी गेला. रात्री साडे अकराच्या अचानक त्याच्या घराची बेल घणघणली. एकदा, दोनदा, अनेकदा… काय झाले हे त्याच्या कुटुंबियांना कळेना. दरवाजाच्या होलमधून बाहेर पाहीले असता घराबाहेर डोक्यावर जाळीदार टोप्या घातलेल्या तरुणांचा जमाव होता. रोहनच्या कुटुंबियांचे धाबे दणाणले. हादरलेल्या अवस्थेत त्यांनी १०० नंबरवर फोन केला असता त्यांच्याकडूनही प्रतिसाद न मिळाल्याचे सांगण्यात येते.

घराचा दरवाजा उघडताच त्या टोळक्याने दमदाटी सुरू केली. रोहनला आमच्या ताब्यात द्या, आम्ही पुढे काय ते बघून घेऊ. इमारतीखालीही काही तरुण उभे असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले. वेळ आणीबाणीची होती. मार खा, किंवा नमते घ्या असे दोनच पर्याय होते. सतत संपर्क करून पोलिसांची मदत मिळत नव्हती. पण काळ आला असला तरीही वेळ आली नव्हती. त्या जमाव आणणाऱ्या मुलाच्या घरच्यांनी मध्यस्ती करून अनर्थ होण्याचा टाळला. अन्यथा कदाचित रिंकू शर्मा सारखीच आणखीन एक घटना मुंबईच्या मालवणी भागातून समोर येण्याची शक्यता होती.

हिंदू कुटूंबातील तरुण २४ तारखेच्या सकाळी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेले असता पोलिसांनी त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. आधी टाळाटाळ करून नंतर पोलिसांनी या विषयात तक्रार घेतली पण एफआयआर मात्र दाखल केला नाही. या विषयात ‘न्यूज डंका’ ने मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याशी संपर्क केला असता पोलिसांनी प्रतिसाद न दिल्याचे म्हणणे त्यांनी फेटाळले. दोन गटात वाद झाला होता पण आता परिस्थिती निवळली आहे. आम्ही त्यांची तक्रार नोंदवली आहे असे त्यांनी सांगितले. एफआयआर संबंधी चौकशी केल्यावर त्यांनी चिडून फोन कट केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या ‘शांतीप्रिय’ तरुणावर या आधीही काही तक्रारी असल्याचे समजते. यात अल्पवयीन हिंदू मुलीशी छेडछाड, नवरात्रीच्यावेळी त्रास देऊन सामाजिक शांतता आणि सलोखा बिघडवणे अशा गोष्टींचा समावेश आहे.

दरम्यान या विषयात भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असून भाजपा नेते आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या विषयात आवाज उठवला आहे. मालवणीत झालेला मॉब लिंचिंगचा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे. ही काय परिस्थिती आहे जिथे हिंदू समाज आपल्या घरातच सुरक्षित नाही ? असा सवाल लोढा यांनी उपस्थित केला आहे.

Exit mobile version