मनसेचे हिंदुत्व, उत्तर भारतीय प्रेम

मनसेचे हिंदुत्व, उत्तर भारतीय प्रेम

एकेकाळी परप्रांतीयांविरोधात रान उठवणाऱ्या आंदोलनांमुळे चर्चेत असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता चक्क मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांना साद घालायला सुरुवात केली आहे. त्यासाठी मुंबईच्या कांदिवली परिसरात भोजपुरी भाषेत बॅनर्स लावण्यात आले आहेत. मनसेच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात मनसैनिकांनी अनेक उत्तर भारतीयांची मारहाण केली होती. मात्र, आता त्याच मनसेकडून उत्तर भारतीयांना साद घातली जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मनसेने हिंदुत्त्वाचा अजेंडा आत्मसात केल्यानंतर पक्षाच्या भूमिकेत पाहायला मिळणारा हा बदल अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरत आहे.

कांदिवली परिसरात लावण्यात आलेल्या या बॅनर्सच्या माध्यमातून मनसेने उत्तर भारतीय मतदारांना पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जय श्री राम हिंदुत्व के सम्मान में “उत्तर भारतीय भी मनसे के साथ मैदान में, अशा ओळी या बॅनर्सवर पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा:

सनराईज कोविड सेंटरमधले मृत्यु शिवसेनेच्या टक्केवारीचे बळी

नरेंद्र मोदींच्या बांग्लादेश दौऱ्याला सुरूवात

संजय राऊतांचे युपीए २ चे इमले

मेळघाटात वनाधिकाऱ्यांची आत्महत्या, सुसाईड नोटमधून धक्कादायक प्रकार उघड

काही दिवसांपूर्वीच मनसेची सदस्य नोंदणी मोहीम सुरु झाली होती. यानंतर घाटकोपर परिसरात नागरिकांना पक्षात सामील होण्याचे आव्हान करण्यासाठी मनसेने गुजराती भाषेत बॅनर्स लावले होते. त्याचीही बरीच चर्चा रंगली होती.

महाराष्ट्रातील बदलती राजकीय समीकरणं लक्षात घेता मनसेने उचललेले हे पाऊल महत्वाचे आहे.

Exit mobile version