मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

राहुल गांधींच्या वक्तव्याचा मनसेकडून निषेध

मनसे उधळणार राहुल गांधींची शेगावमधील सभा

काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत दौऱ्यावर असून, सध्या ते महाराष्ट्रात आहेत. यादरम्यान त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी केलेल्या विधानामुळे वाद पेटला आहे. राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. काल भाजपाने नागपूरमध्ये तर शिंदे गटाने ठाण्यामध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन केले. यामध्ये मनसेने राहुल गांधींची शेगावमध्ये असलेली सभा उधळण्याचा इशारा दिला आहे. यासाठी महाराष्ट्रातून मनसैनिक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहेत.

शुक्रवार, १८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा आहे. ही सभा उधळून लावणासाठी मनसेचे कार्यकर्ते शेगावमध्ये दाखल झाले आहेत. संदीप देशपांडे, प्रकाश महाजन आणि नितीन सरदेसाई यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली असून, यामध्ये रणनीती ठरवण्यात आली आहे. संदीप देशपांडे यांनी काँग्रेसला चोख उत्तर देणार असल्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसकडून वारंवार स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना चाप लावणं गरजेचं आहे. आम्ही अनेक मोठ्या भाईंची भाईगिरी उतरवली आहे, आता पप्पूंची पप्पूगिरी उतरवण्यासाठी जात आहोत. काँग्रेसच्या नेत्यांना धडा शिकवण्याची गरज असून, आम्ही तो शिकवणार, असं संदीप देशपांडे यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा : 

भारतात येणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ

महाराष्ट्रातील भाविकांसाठी अयोध्येत भक्त निवास ?

‘त्या’ बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या पदयात्रेत दिसतात, हे दुर्दैव!

श्रद्धाच्या हत्येसंदर्भात फक्त किचनमध्ये सापडले रक्ताचे अंश

आदित्य ठाकरेंवर टीका करताना देशपांडे म्हणाले, सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्रातील नेते चालत आहेत. हे दुर्दैवी आहे. आमचे कार्यकर्ते म्हणतात त्याप्रमाणे अशा लोकांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, असा टोला देशपांडे यांनी ठाकरेंना लावला.

Exit mobile version