विधानसभेला मनसे २५० जागा लढवणार

राज ठाकरेंचे एकला चलो रे चे संकेत

विधानसभेला मनसे २५० जागा लढवणार

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार आहे. यावेळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत बसवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबईत रंगशारदा सभागृहात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा कार्यकता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राजा ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय सर्व्हे होणार आहे. जे निवडून येऊ शकतात, ज्यांची शक्ती आहे, त्यांनाच यावेळी पक्षाची उमेदवारी मिळेल, याची नोंद घ्यावी. सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्याना प्रामाणिकपणे माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी युती होईल का, कोणाशी होईल याचा अजिबात विचार करू नये. आपण येणाऱ्या १ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

कोल्हापुरात पंचगंगेचा रेड अलर्ट !

कॅनडातील हिंदू खासदार चंद्र आर्य यांना खलिस्तानी दहशतवादी पन्नूकडून धमकी

पुण्यात पावसाचा हाहाःकार; शहरासह जिल्ह्यात पूरस्थिती

Exit mobile version