मनसे पुण्यात ३५०० ‘अ‍ॅम्बेसेडर’ नेमणार

पुणे महानगरपालिकेची सज्जता

मनसे पुण्यात ३५०० ‘अ‍ॅम्बेसेडर’ नेमणार

पुणे महापालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सज्ज झाले आहेत. पुण्यासाठी त्यांनी नवी रणनीती आखली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी दूत नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्ष सचिवांची बैठक घेतली होती.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत पदाधिकारी आणि पक्ष सचिवांच्या घेतलेल्या बैठकीत पुण्यात ३५०० ‘अ‍ॅम्बेसेडर’ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील प्रत्येक सामान्य नागरिक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने अ‍ॅम्बेसेडर ही नवीन संकल्पना आणली आहे. मनसे या उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील प्रत्येक घराघरात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुण्यात लवकरच राजदूतांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. या बैठकीनंतर लवकरच आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भव्य सभा होण्याची शक्यता असल्याचे म्हटल्या जात आहे.

हे ही वाचा:

भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू

मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी

मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश

भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव पण पाकिस्तानची गोची

मनसेचे पुण्यात २९ नगरसेवक

आले मनसेच्या स्थापनेपासून ठाकरे यांनी नाशिक आणि पुण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. पुण्यात पहिल्याच प्रयत्नात मनसेचे २९ नगरसेवक निवडून आले. रमेश वांजळे यांच्या रूपाने एक आमदारही मिळाला . त्यामुळे ठाकरेंना पुण्याकडून नेहमीच आशा आहेत. विस्तारित पुणे दौऱ्याचा भाग म्हणून आणि आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी पुण्यात राजदूत नेमण्याचा राज ठाकरे यांचा विचार सुरू आहे.

Exit mobile version