एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, गुरुवार, ३० जून रोजी बहुमत चाचणी होणार आहे. यादरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपाला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदेसह ४० हुन अधिक आमदारांनी बंड पुकारले असून, हे आमदार सध्या गुवाहाटी येथे आहेत. अचानक एवढ्या आमदारांनी बंड पुकारल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळेच राज्यपालांच्या निर्देशानुसार, उद्या ठाकरे सरकारला आपले बहुमत सिद्ध करावे लागणार आहे.
हे ही वाचा:
डोंबिवलीच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा
आम्ही उद्या मुंबईत येणार; कामाख्या देवीच्या दर्शनानंतर एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
किशोरी पेडणेकरांना पून्हा त्याच नावाने धमकीचे पत्र
महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश
यादरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार,२९ जून रोजी म्हणजेच आज राज ठाकरेंसोबत फोनवरून चर्चा केली आहे. या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना भाजपासोबत उभं राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनांनंतर राज ठाकरेंनी भाजपाला पाठिंबा देण्यास होकार दिला आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहेत. यावेळी भाजपाचे आमदार आणि नेते अतुल भातखळकर यांनी देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असे, ट्विट केले आहे.
हारी बाजी को जितना
जीसे आता है
वो देवेंद्र ही दोस्तों
कहलाता है…पुन्हा येणार, येणारच…@Dev_Fadnavis pic.twitter.com/Mdfzm1xzBk
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 29, 2022