दादरच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कमध्ये मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवाजी पार्कवरील विद्युत रोषणाईसाठी लागणारे दिवे इटलीतून आयात कारण्यात आले आहेत. त्यावरूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकेची तोफ डागली आहे.
‘शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन?’ असे ट्विट संदीप देशपांडे यांनी करून शिवसेनेला सवाल केला आहे.
शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटली मधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटली च लांगुलचालन?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 19, 2021
मुख्यमंत्री निधीतून सुमारे १ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा प्रकल्प साकारला आहे. ही रोषणाई कायमस्वरुपी असणार आहे. ही सर्व विद्युत रोषणाई करण्यासाठी दिव्यांसह इतर सर्व साहित्य हे इटली येथून नेरी या आंतरराष्ट्रीय कंपनीकडून मागविण्यात आले आहे. या सर्व साहित्याला आंतरराष्ट्रीय मानांकन आहे. संपूर्ण शिवाजी पार्कला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
मंदाकिनी खडसे ईडी समोर आज राहणार हजर
दोन डोस घ्या, आरटीपीसीआर करा आणि मगच अधिवेशनाला या!
शिवाजी पार्क मैदान शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचे आहे. शिवसेनेच्या स्थापनेची पहिली भव्य सभा याच मैदानावर झाली होती. मनसेच्या स्थापनेचीही पहिली सभा याच मैदानात पार पडली होती.