मनसेच्या आक्रमक नेत्या रुपाली पाटील यांनी मनसेतून राजीनामा दिला आहे. पाटील यांनी दिलेला राजीनामा हा मनसेसाठी मोठा धक्का मानला जात असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
‘सूर्य तळपतील चंद्र झळकतील| तारे आपुला क्रम आचरतील|| असेच वारे पुढे वाहतील| जन पळभर म्हणतील, ‘हाय हाय’ असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. पक्षाचे काम पुढे चालू राहणार अशा आशयाचे हे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. राजीनाम दिल्यानंतर रुपाली पाटील यांनी पत्रकार परिषद घेत पक्षातून राजीनामा दिला असला तरी राज ठाकरे यांचे स्थान हृदयात तसेच असल्याचे सांगितले.
सूर्य तळपतील चंद्र झळकतील। तारे अपुला क्रम आचरतील।। असेच वारे पुढे वाहतील।जन पळभर म्हणतील, 'हाय हाय!' @Rupalipatiltho1
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 15, 2021
राज ठाकरे यांना पाहत राजकारणात प्रवेश घेतला, राज ठाकरे यांचे स्थान हृदयात तसेच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचेही त्यांनी सांगितले. काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. मात्र, त्या बदलत नाहीत म्हणून स्वतःमध्येच बदल करायला हवे, असे त्या म्हणाल्या. मनसेमध्ये काय चुकत आहे ते राज ठाकरे सांगतील, असेही त्या म्हणाल्या. १४ वर्षे काम केले आहे आणि आता इतक्या वर्षानंतर पक्षातून बाहेर पडण्याचे दुःख आहे, असे रुपाली पाटील म्हणाल्या.
हे ही वाचा:
आंबेडकर द लिजंड मध्ये हा अभिनेता करणार बाबासाहेबांची भूमिका
हुतात्मा सहकाऱ्याच्या बहिणीला जवानांनी दिला आशीर्वाद
अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला भारतात आणले
संतापजनक! MPSC ने केली मृत स्वप्निल लोणकरची क्रूर थट्टा
राज ठाकरे हे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्याचा आणि राजीनाम्याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या काम करण्याच्या पद्धतीने स्वीकारले तर मी एखाद्या पक्षात जाईन. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडून ऑफर आल्याचे त्यांनी सांगितले.