मोदींच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण नाही? मुनगंटीवार म्हणाले…

ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घालणार, मंत्री मुनगंटीवार

मोदींच्या शपथविधीला मनसेला निमंत्रण नाही? मुनगंटीवार म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला.पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत देशात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन केले.या भव्य सोहळ्यात परदेशातील, देशातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, या सोहळ्याला मनसेला निमंत्रण नसल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. यावर भाजपने नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.ते म्हणाले की, ‘घाई गडबडीमध्ये मनसेला निमंत्रण देण्यात विसर पडला असावा, त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही भाव असेल’ असे मला वाटतं नाही.परंतु, याची नोंद केंद्रीय पक्षांनी घेतली पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत साध्य करत सरकार स्थापन केले.यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये मनसेसुद्धा सामील होती.परंतु, पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्याला मनसेला निमंत्रण देण्यात न आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.याबाबत भाजप नेते मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना प्रश्न विचारण्यात आला.यावर मुनगंटीवार म्हणाले की, याबाबत मला काही माहिती न्हवती.चौकशीकरिता मनसे नेते नांदगावकर यांना फोन करून विचारपूस केली.तेव्हा त्यांनी सांगितले की शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाही, त्यानंतर मला याची माहिती मिळाली.

हे ही वाचा:

‘नीट’ परीक्षा याचिकेवर सुनावणी घेत सर्वोच्‍च न्‍यायालयाने NTA ला बजावली नोटीस

कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपाला ठोकल्या बेड्या!

संजय राऊतांना पुळका, म्हणे नरेंद्र मोदींनी मुस्लीम मंत्री का नाही बनवला?

एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला; सीमा प्रश्नांवर तोडगा काढण्याचा निर्धार

ते पुढे म्हणाले की, ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर मी नक्कीच टाकेन.घाई गडबडीत हे झालं असावं, यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला काही वाटत नाही.कधी-कधी घाई-गर्दीमध्ये निमंत्रणाची जी यादी तयार केली जाते.ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचार नुसार केली जाते.त्यामध्ये आपल्या बऱ्याच जवळच्या मित्रांना निमंत्रण द्यायचं राहून जात.यामध्ये दुसरा भाग अशुच शकत नाही, परंतु केंद्रीय पक्षांनी याची नोंद घेतली पाहिजे.आपल्याला एखादा मित्र मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा अशी चूक होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.

 

Exit mobile version