इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

इतका कन्फ्यूज मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिला नाही, मनसेचे सडेतोड

शुक्रवारी रात्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. शनिवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या या संवाद कार्यक्रमाचा जाहीर समाचार घेतला. “इतका कनफ्युज मुख्यमंत्री आजवर बघीतला नाही.” असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. देशातली सर्वाधिक कोरोना रूग्णसंख्या ही महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाॅकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला लाॅकडाऊनचा इशारा दिला. तर त्याचवेळी विरोधकांवर टीकाही केली. लाॅकडाऊन लावला तर रस्त्यावर उतरू असे म्हणणाऱ्यांनी कोरोना विरोधात रस्त्यावर उतरावे असे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा:

सचिन वाझेशी संबंधित आणखीन एक गाडी एनआयएच्या ताब्यात

सेक्युलारिजम आणि कम्युनालिजमच्या खेळाने देशाचे मोठे नुकसान केले आहे

सचिन वाझेच्या प्रकृतीला धोका

मलंगगड प्रकरणात चार मुसलमान तरुणांना अटक

मुख्यमंत्र्यांच्या या संवादावर विरोधी पक्षाकडून सडकून टीका केली जात आहे. शनिवारी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना सडेतोड उत्तर दिले. आपण इतका कनफ्युज मुख्यमंत्री पाहिला नाही असा सणसणीत टोला देशपांडे यांनी लगावला.

तज्ञ कोण?
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात अशा परिस्थितीत काय करावे असा सवाल राज्यातील जनतेलाच विचारला तर तज्ञांशी चर्चा करून लाॅकडाऊन संदर्भात निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. हे ऐकून मुख्यमंत्री राज्याच्या कोविड टास्कफोर्स मधल्या डाॅ. लहाने, डाॅ.ओक यांच्याशी चर्चा करतील असे वाटले होते. पण मुख्यमंत्र्यांचे शनिवारचे कार्यक्रम बघता ते जीम मालक, नाट्यनिर्माते, संपादक वगरे मंडळींना भेटणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मते हे तज्ञ आहेत का? असा सवाल देशपांडे यांनी विचारला आहे.

तुम्ही घरी होतात, जनता रस्त्यावर होती
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोविडविरोधात रस्त्यावर उतरा या वाक्यावरून संदीप देशपांडेंनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच धारेवर धरले. पहिला लाॅकडाऊन होता तेव्हा तुम्ही काहीही केले नाहीत. तुम्ही घरात बसून होतात. पण जनता मात्र रस्त्यावर उतरून आपापल्या परिने काम करत होती. आवश्यक तिथे धान्य, जेवण, औषधे पुरवणे अशी सगळी मदत जनता एकमेकांना करत होती. पण तुम्ही काहीही केले नाही. तुम्ही जम्बो कोविड सेंटर उभारलीत आणि ओळखीच्या लोकांना त्याची कामे देऊन पैसे वाटलेत. या व्यतिरिक्त काहीही केले नाहीत असा आरोप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.

Exit mobile version