23.6 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरराजकारणमनसे नेते प्रकाश महाजनांनी आव्हाड, संजय राऊतांना चांगलेच सुनावले!

मनसे नेते प्रकाश महाजनांनी आव्हाड, संजय राऊतांना चांगलेच सुनावले!

आव्हाडांनी काय मुस्लिमांचा ठेका घेतलाय? तर राऊतांनी स्वतःच्या भाषेकडे पाहावे!

Google News Follow

Related

राज्यात सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतील त्रुटींबाबत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले होते. त्याअंतर्गत दोन पेक्षा अधिक मुले असलेल्या किंवा बहुपत्नी असलेल्यांना या योजनेचा लाभ देऊ नये असे विधान केले होते. त्यांचा रोख मुस्लिमांकडे असल्याचे म्हटले गेले. त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती तर

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुस्लिम द्वेष कामाचा नाही. आमच्या मनात मुस्लिम द्वेष नाही. मी लाडली बहीण योजनेतील मी त्रुटी सांगितली की, डोमिसाइलची अट काढली तर शेकडो बांगलादेशी त्याचा फायदा घेतील. त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे. बांगलादेशी जर मुस्लिम निघाले तर त्यात माझा दोष काय? ज्यांची एकापेक्षा अधिक मुले आहेत किंवा अधिक पत्नी आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्याबाबत माझा आक्षेप आहे. एकापेक्षा अधिक मुले ही हिंदू असो वा मुस्लिम दोन्हीमध्ये आहे. तर बहुपत्नित्व हे मुस्लिम समाजातच दिसते. ज्या मुस्लिमाला एक पत्नी आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळावा माझे त्याबद्दल काहीही म्हणणे नाही. पण जितेंद्र आव्हाड हे मुस्लिमांचे ठेकेदार असल्याप्रमाणे का बोलतात? याचे कारण असे की, आव्हाड ज्यांच्या मतांवर निवडून येतात, त्यांना खुश करण्यासाठी ते बोलतात. आव्हाड यांच्या नसानसात हिंदू द्वेष भरला आहे, असे मी म्हटले तर ते काय करतील?

महाजन म्हणाले की, देशाच्या सैन्यात हिंदू जास्त आहेत, स्वाभाविकपणे देशाच्या सीमारक्षमात हिंदूंचे बलिदान होते. पोलिस यंत्रणेत हिंदू जास्त. काही प्रसंग आला हिंदू जास्त बळी पडतात. हा देश बहुसंख्य हिंदूंचा आहे. या देशातील शासकीय योजनांवर हिंदूंचा जास्त अधिकार असावा हे चूक कसे काय? त्यागात, बलिदानात हिंदू पुढे असेल तर त्यांना सवलती मिळाल्याच पाहिजेत. यात चूक काय. काहीतरी चुकीचे नरेटिव्ह सेट करायचे, राजकीय पोळी भाजायची हे जितेंद्र आव्हाड यांनी सोडले पाहिजे.

हे ही वाचा:

राम मंदिराच्या गाण्यावर नाचल्याबद्दल मुस्लिम जमावाने घरात घुसून केला हल्ला!

जगातील पहिली सीएनजी बाईक नितीन गडकरींच्या हस्ते पुण्यात लाँच

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत; नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या निर्माण करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या सूचना

संजय राऊत यांनी सामनात लेख लिहिला यासाठी कार्यकारी संपादकाचे आभार मानतो. ग्रामीण भागात अनेक म्हणी, वाकप्रचार आहेत. जातीजातींबद्दल अशा म्हणी आहेत. कुणाचे मन दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कुणाचे मन दुखावले असेल तर मी हृदयापासून माफी मागतो.

मला आश्चर्य वाटते की, संजय राऊत यांनी हा विषय उचलावा. ज्या सामनाच्या संपादकपदी एक महिला आहे. हा कार्यकारी संपादक त्याच्या सहकाऱ्याच्या बायकोला गलिच्छ शिव्या देतो, त्याबद्दल सामनात कधी काही आले आहे का. रोज आपल्या ड्रेनेजचे झाकण उघडे ठेवून ऑन द रेकॉर्ड बोलतो त्यात ते काय भाषा वापरतात त्याबद्दल सामना काही बोलतो का, माझ्या नेत्याला सुपारीबाज म्हणतात. संजय राऊत यांनी सिद्ध करून दाखवावं सुपारीबाज म्हणून. कंगना राणावतविषयी राऊत यांनी काय शब्द वापरले आहेत, देशाच्या पंतप्रधानांविषयी तुम्ही काहीही बोलता आणि दुसऱ्याला शिकवाय़ला जाता.

लोकसंख्या नियंत्रणात आणली पाहिजे. एका कुणा धर्माची, जातीची ती जबाबदारी नाही. सगळ्या देशवासियांची ही जबाबदारी आहे. मतदान करतील त्यांनाच सरकारी लाभ मिळतील. ते मतदान त्यांनी कुणालाही करावे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा