मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आज भेट झाली. या भेटीवर मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मोठं विधान केलं आहे.
मनसे आणि भाजपा भविष्यात एकत्र येणार असेल तर आनंदच होईल, असं सूचक विधान बाळा नांदगावकर यांनी केलं. त्यामुळे राज-पाटील भेटीत युतीवरच अधिक चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज ठाकरे, अमित ठाकरे हे नाशिक, पुणे आणि ठाण्याच्या दौऱ्यावर होते. मुंबईतही आमची मोर्चेबांधणी सुरू आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं काम करत आहोत. व्यक्तिगत पातळीवर सर्वच पक्षाची कामं सुरू आहेत. पण दोन पक्ष भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न असेल तर त्याचा आनंदच असेल, असं नांदगावकर म्हणाले.
राजकारणात पुढच्या मुव्हमेंट करायच्या असतात. त्याचे काही ठोकताळे असतात. त्या ठोकताळ्याचा अंदाज प्रत्येक पक्ष घेत असतो. शरद पवारांनी ठोकताळ्यांचा अंदाज घेऊन उद्धव ठाकरेंना बोलवून केलं ना सरकार. आजचाही हा ठोकताळाच आहे. त्याप्रमाणे होणार काही घटना, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
हे ही वाचा:
आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
काय ठरलं राज ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत?
न्यायालयाने विचारणा केल्यावर तरी राज्य सरकारला जाग येणार का?
लोकल प्रवास नाकारणारे जनविरोधी ठाकरे सरकार
मनसे पुन्हा हिंदुत्वाची भूमिका घेणार आहे का?, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, राज ठाकरे यांच्या रक्तातच हिंदुत्व आहे. त्यामुळे तसा काही प्रश्नच येत नाही. आम्ही हिंदुत्व घेऊनच जात आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तर मनसे आणि भाजपने एकदा ताकद आजमावून दाखवावीच या शिवसेना नेते संजय राऊत यांच्या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. संजय राऊतांनी एकदा निवडणूक लढवून दाखवावीच, असं आव्हान त्यांनी दिलं.