तेव्हा मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेल्या अशांनी तेव्हा बघितले तब्येतीचं कारण सांगून. पण एकनाथ शिंदेंनी कांडी फिरवली आता फिरताहेत सगळीकडे. यांच्यासारखा वागणाऱ्यातला मी नव्हे. स्वार्थासाठी दिसेल तो हात धरायचा आणि कोपऱ्यात बसायचे हे धंदे मी नाही करत. हे काही करणार नाहीत मराठी असो की हिंदुत्व उद्धव ठाकरेंच्या अंगावर एक तरी केस आहे का? कारण भूमिकाच घेतली नाही. घ्यायची नाही. फक्त पैशासाठी कधी हा कधी तो. फक्त मला सत्तेत बसवा, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मनसेने केलेली आंदोलनं देश तोडण्यासाठी केलेली नाहीत तर महाराष्ट्रातल्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी आंदोलनं केली आहेत. पण आमच्या आंदोलनावरून रान उठवण्यात आलं. आपलया भूमिका लोकांपर्यन्त नीट जाण्याचे गरजेचे आहे अशी ठोस भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली. गोरेगावच्या नेस्को सेंटर येथे मनसेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
मशिदीवरचे भोंगे उतरले नाहीत तर पुन्हा हनुमानचालिसा
राज ठाकरे यांनी पुन्हा मशिदींचा मुद्दा उपस्थित केला. मशिदींवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत त्यांची इच्छा आपण पूर्ण केली. त्याचे कारण आपण भोंगे काढा सांगितले नाही. नाही काढले तर हनुमान चालिसा लावू. या एका गोष्टीसाठी निघाले. तरीही सर्व तमाम मनसैनिकांनो, गटाध्यक्षांनो अजूनही चरबी उतरलेली नाही. जिथे म्हणून हे भोंगे चालू असतील. पोलिसांत तक्रार करा प्रथम. जर ऍक्शन घेतली नाही. केस होऊ शकते पोलिसांवर. न्यायालयाच्या अवमानाची. प्रथम पोलिसांत सांगा. बंद करा. काही झालं नाही त्यांच्याकडून तर मोठ्या ट्रकवर मोठ्या स्पीकरवर हनुमान चालिसा वाजवा. त्याशिवाय वठणीवर येणार नाहीत हे. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंतसुरूच राहणार.
राज ठाकरे म्हणाले की, मनसे स्थापन होऊन १६-१७ वर्ष झाली. या १७ वर्षात मनसेने अनेक आंदोलने केली. कोणत्याही पक्षांनी केलेल्या आंदोलनांच्या तुलनेत आपल्या आंदोलनाला सर्वात जास्त यश मिळालेलं आहे. गेल्या १६-१७ वर्षात जी आंदोलने केली त्याचा स्ट्राईक रेट जास्त आहे. परंतु मनसेने केलेली आंदोलने विस्मरणात जाण्यासाठी काही यंत्रणा काम करत आहेत असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांनी प्रवक्त्यांवरही शरसंधान केले. ते म्हणाले की, राजकारणाचा दर्जा किती खाली जावा याला काही मर्यादा. प्रवक्ते जे बोलतात त्यांची भाषा काय. मी असा महाराष्ट्र आजपर्यंत बघितला नाही. एक मंत्री एका महिला नेत्या भिकारचोट म्हणतो. इथपर्यंत पातळी गेली. तेही टीव्हीवर. इतक्या खाली जायचं असेल ना तर यांची नावं घ्यायची बंद करा. काय भाषा असते. त्यांना वाटते विनोद करतोय. काही प्रवक्ते बोन्सायएवढे, पण बोलतात केवढे तू कोण आहेस. आपली लायकी काय, काय बोलतो आहोत, याचे भान बाळगा.
टोलनाक्यांच्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. आम्ही आंदोलन करूनही सर्व प्रश्न आम्हाला विचारले जातात, आमच्यामुळे अनेक टोलनाके बंद झाले. मात्र अनेकांनी केवळ घोषणा केल्या त्यांना कुणी विचारले का? आम्ही महाराष्ट्राच्या लोकांसाठी आंदोलन केली, ते युपी, बिहारच्या विरोधात नव्हती.
हे ही वाचा :
सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा
‘पोलिस’ निघाले चोर; २२ लाख लुटले
‘आदित्येंच्या वयापेक्षा जास्त वर्ष शिवसेनेत आम्ही काम केलंय’
आसाममध्ये होणार महाराष्ट्र भवन, मुख्यमंत्र्यांची घोषणा
अजुनही वातावरणामध्ये निवडणूक दिसत नाही
गट अध्यक्ष म्हणजे लोकांमध्ये उतरून बोलणारा राज ठाकरे आहे. अजुनही वातावरणामध्ये निवडणूक दिसत नाहीये. आगामी काही म फेब्रुवारी – मार्च महिन्यात निवडणूक लागतील असं कळतंय. महाराष्ट्राचा सर्व बाजुने खोळंबा झालाय, मात्र त्यांना डोकी खाजवू द्या, आपण तयारी करू असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले