ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी

ठाकरे सरकारचे आदेश झुगारून मनसेने फोडली हंडी

ठाकरे सरकारच्या प्रतिबंधक आदेशांना झुगारून राज्यात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. ठाकरे सरकारने महाराष्ट्रात सार्वजनिक स्तरावर सण उत्सव साजरे करण्यास मनाई केलेली असताना सरकारी आदेशाला केराची टोपली दाखवत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यात प्रामुख्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांतर्फे मुंबई-ठाण्यात दहीहंडी उत्साहात साजरा करण्यात आली. तर यासाठी मनसे नेत्यांची धरपकडही पोलिसांमार्फत करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दर वर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा केला जातो. मुंबई उपनगर आणि ठाण्यातील दहीहंडी यांची तर जगभर चर्चा झालेली पाहायला आली आहे. पण गेली दोन वर्ष कोविड प्रतिबंधक नियमावलीच्या नावाखाली या उत्सवांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. गेल्या वर्षी सर्वांनीच हे प्रतिबंध पाळले. पण या वर्षी कोरोना आकडेवारी कमी झाल्यामुळे तसेच लसीकरणही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या नियमावली विरोधात आवाज उठताना दिसत आहे.
सत्ताधारी पक्षांच्या सभा, आंदोलने सरकारी दौरे या सगळ्याच गोष्टी राजरोसपणे सुरू असताना फक्त धार्मिक सण उत्सवांवर ते बंद का असा सवाल ठाकरे सरकारला विचारला जात आहे?
हे ही वाचा:

तालिबानी शाहिद आफ्रिदी?

सिंहराज अधानाने मिळवले कांस्य पदक

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष?

‘केरळ मॉडेल’ तोंडावर आपटले

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यापासूनच दहीहंडीच्या विषयात आक्रमक राहिला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव संदीप देशपांडे या साऱ्यांनीच दहीहंडी उत्सव साजरी करणार अशी भूमिका घेतली होती. त्यानुसार मानखुर्द, मुलुंड, वरळी नाका, मलबार हिल, काळाचौकी, ठाणे अशा विविध भागात मनसे मार्फत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.
मनसेच्या या पवित्र्यामुळे अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी पोलिसांमार्फत कार्यकर्त्यांची धरपकड झाल्याची पाहायला मिळाली आहे यामध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांचाही समावेश आहे. मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करू नये यासाठी नेत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या होत्या.
Exit mobile version