आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

आठ दिवसांतून एकदा पाणी; औरंगाबादमध्ये भाजपा-मनसेचे आंदोलन

औरंगाबादमध्ये भारतीय जनता पार्टीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाण्यासाठी आंदोलन केले. आज, ६ मे रोजी भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद शहरातील महापालिका पाणीपुरवठ्याच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. ऐन उन्हाळ्यात आठ दिवसातून एकदा पाणी येत नसल्याने जनतेने संतप्त होऊन आंदोलन केले आहे.

काही दिवसांपूर्वी याच भागातील लोक सिडकोतील एन ५ इथे पाण्याच्या टाक्याजवळ दिवसभर आंदोलन केले होते. त्यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र,अद्याप पाणीपुरवठा सुरळीत झालाच नाही. ९ ते १० दिवसांनंतर एकदा पाणी मिळू लागल्यामुळे नागरिकांचा संताप वाढू लागला आहे. त्यामुले नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी आयुक्तांनी जनतेला आश्वासन दिले होते. १५ ते २० दिवसात सुरळीत पाणीपुरवठा करू मात्र त्यापेक्षा जात दिवस उलटून गेले तरी पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. आठ दिवसातून येणाऱ्या पाण्याला देखील दुर्गंध येत असल्याची नागरिकांनी सांगितले आहे. यावेळी भाजपा आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

हे ही वाचा:

WHO च्या कोरोना मृत्यूच्या आकडेवारीवर केंद्र सरकारचा आक्षेप

राज्यातील २८व्या महापालिकेची घोषणा

जम्मू-काश्‍मीरमध्ये सीमेलगत आढळले भुयार

‘कोरोना संपताच CAA लागू होणार’

दरम्यान, या उन्हाळ्यात पाण्यासाठी भाजपाने औरंगाबादमध्ये आंदोलन लावून धरले आहे. त्यात आता भाजपाला मनसेनेही साथ दिली आहे. महानगरपालिका प्रशासनाने जर लवकर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करु असा इशारा देखील मनसेच्या नेत्यांनी दिला आहे.

Exit mobile version