देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसे झाली आक्रमक

संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा संशय

देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसे झाली आक्रमक

मनसे  नेते  संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना  आता आक्रमक झाले आहेत. या हल्ल्यामागे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा संशय मनसेने व्यक्त केला आहे.  मनसे  नेते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी शिवाजी पार्क परिसरात मॉर्निंग  वॉकसाठी गेले असताना अज्ञात लोकांनी हल्ला केला असून त्यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झालेली आहे. हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल केल्यानंतर मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाली आहे का ते बघण्यासाठी एक्स रे काढलेला आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

देशपांडे यांच्यावरील हल्ल्याची बातमी हि वाऱ्यासारखी पसरली असून मनसेचे सर्व नेते आणि कार्यकर्ते यांनी हिंदुजा रुग्णालयात धाव घेतली आहे.  मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोघेही काही वेळेपूर्वीच रुग्णालयात पोचून त्यांनी देशपांडे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. मनसे  नेते नितीन सरदेसाई आणि इतर कार्यकर्ते हल्ला झाल्यानंतर त्वरित्च रुग्णालयात पोचले आहेत. याशिवाय भाजप आमदार नितेश राणे हे देखील देशपांडेच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात पोचले आहेत. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर आता संपुर्ण राजकीय वर्तुळात विविध प्रतिकिया बघायला मिळत आहेत. या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे हे अजून समोर आलेले नाही.

हे ही वाचा:

हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे सुश्मिता सेनने लिहिले आणि…

दोघे गुजरातवरून आले आणि शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्याची भिंत ओलांडली

ओदिशात सापडले १०० नंबरी सोने…

कसब्यावर बोलू काही… भाजपाच्या सोशल इंजिनिअरींगमध्ये ब्राह्मणांना स्थान नाही का?

मागील काही दिवसांपासून संदीप देशपांडे हे सतत मुंबई महानगरपालिकेच्या घोटाळ्यांबद्दल बोलत आहेत. म्हणूनच हा हल्ला करण्यात आल्याचे बोलले जाते आहे. दरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानापासूनच जवळच हा हल्ला झाला आहे. देशपांडे हे सुद्धा शिवाजी पार्क परिसरात राहतात. रोज सकाळी ते चालण्यासाठी पार्कात जातात त्याप्रमाणे ते आज पण गेले होते.   एका टोळक्याने दबा धरून त्यांच्यावर स्टंमच्या साह्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यांच्यावर मागून हल्ला केल्यामुळे त्यांनी आपल्या डोक्यवरील हल्ला चुकवला आणि हाताने अडवला याच झटापटीत त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

देशपांडे यांच्यावर प्राथमिक उपचार करून आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशपांडे हे व्हील चेअर वर बसूनच रुग्णालयाच्या बाहेर आले. त्यानंतर राज ठाकरे यांच्या च एका गाडीत बसून ते घराकडे गेले आहेत. संदीप ठाकरे हे रुग्णालयातून निघेपर्यंत राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे होइंदूजा रुग्णालयातच त्यांच्याबरोबर होते आता देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.   या संपूर्ण प्रकरणानंतर भाजप नेते , आशिष शेलार यांनी निषेध व्यक्त करत मलाही अशीच सुपारी देऊन धमकी दिली असल्याची माहिती देऊन देशपांडे आणि माझ्यावरचा होणार हल्ला यात काही समान धागा आहे का ?हे बघणे उचित ठरेल.

Exit mobile version