26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणठाण्यातील विकासकामांना शिवसेनेकडून मूठमाती

ठाण्यातील विकासकामांना शिवसेनेकडून मूठमाती

Google News Follow

Related

विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांची टीका; कळवा दुर्घटनाग्रस्तांना दिली भेट

धोकादायक दरडी असलेल्या परिसरात शासकीय यंत्रणांना हाताशी धरुन बिनधास्तपणे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्यामुळे कळवा येथील दुर्घटना घडली असून अशा प्रकारांना तातडीने अटकाव आणण्याची आवश्यकता असून अनिधकृत बांधकाम करणा-या प्रवृत्तींना मोक्का लावण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष प्रवीण दरेकर यांनी आज केली. तसेच ठाणे महानगरपालिकेमध्ये सुमारे २०-२५ वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेने ठाणे येथील विकासकामांना मूठमाती दिल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज ठाणे कळवा घोलाईनगर येथील दुर्घटनेतील जखमींची छत्रपती शिवाजी महाराज पालिका रुग्णालयात जाऊन भेट घेतली. त्यानंतर रुग्णालयातील अधिष्ठातांशी जखमींच्या उपचाराविषयी चर्चा केली. त्यानंतर दरेकर यांनी ठाणे महापालिका शाळेला भेट देऊन तेथे तात्पुरत्या निवासाला असलेल्या दरडग्रस्तांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष, आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, संदीप लेले, गटनेते मनोहर डुंबरे, मृणाल पेंडसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर म्हणाले, दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विक्रोळी, चेंबूर, भांडुप अशा अनेक ठिकाणी घटना घडल्या आहेत. या घटना का घडल्या, याच्या मुळाशी गेल्यावर असे दिसून येते की, अनधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर होत असून शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अनधिकृत बांधकामे होत आहेत. याकडे दुर्लक्ष केले जात असून जर ते थांबले नाही तर अशा प्रकारच्या अनेक घटना घडू शकतात असा इशाराही देरकर यांनी दिला.

हे ही वाचा:
देव कुलुपात तर डान्स बार खुलेआम सुरू

गणेशमूर्ती साकारणारे हात पुन्हा आर्थिक विवंचनेत

नेपाळचे नवे पंतप्रधान देऊबा भारताशी मैत्री करायला उत्सुक

ऑलिंपिकला सुरूवात होणार…….पहा काय आहे वेळापत्रक!!!

कळवा येथील दुर्घटना ही अतिशय हृदय हेलावणारी आहे. अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागला. निरागस बालिकांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरची लोकं मृत्युमुखी पडल्याची कल्पनासुद्धा या निष्पाप जीवांना नाही. राज्याची गाडी रूळावर आणण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असून राज्याचा गाडा त्यांनी नीट चालवायला हवा. मुख्यमंत्री पंढरपूरपर्यंत गाडी चालवण्याचे एवढं कौतुक होत आहे. परंतु मातोश्री ते मंत्रालय मुख्यमंत्री गाडी चालवू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांत महापालिका, प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणाऱ्या दुर्घटना होत आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये २०-२५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे परंतु शिवसेनेने सत्तेच्या काळात ठाणे येथील विकासकामांना मूठमाती दिली असून अनधिकृत बांधकांना पाठीशी घातलं आहे, त्यामुळे आज सरकारच्या बेफिकिरी, निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा आरोप दरेकर यांनी केला.

ठाणे महानगरपालिकेत सत्तेच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांनी एसआरएची संकल्पना आणली, झोपडपट्ट्या वाढू नये यासाठी त्यांनी निर्णय घेतला परंतु तरीही अनधिकृत झोपडपट्ट्यांचे बांधकाम थांबले नाही. प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून वनजमिनीची जागा, महसूलची जागा अतिक्रमित करून भूमाफिया अनधिकृतपणे बांधकाम करत आहेत आणि गरीब माणूस स्वस्तात मिळणा-या झोपडपट्टीत राहायला जात आहे आणि त्याला मृत्यूला सामोरे जावे लागत आहे, अशी खंतही दरेकर यांनी यावेळी व्यक्त केली.

दरेकर पुढे म्हणाले की, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना सांगितले की, अतिक्रमण करणा-या भूमाफियांवर मोक्का लावा. जितेंद्र आव्हाड मंत्री आहेत, गृहनिर्माण खात्याचे मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे आपण पुढाकार घेतला तर भाजपचे सर्व आमदार, लोकप्रतिनिधी नक्कीच मदतीला येतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा