पुरग्रस्त वाऱ्यावर, सरकार खूर्ची बचाव कार्यात व्यस्त

पुरग्रस्त वाऱ्यावर, सरकार खूर्ची बचाव कार्यात व्यस्त

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘पुरग्रस्त नागरिकांना वाऱ्यावर सोडून सरकार खूर्ची बचाव कार्यात व्यस्त आहे’ असा घणाघात पडळकर यांनी केला आहे. तर सरकारने कुठल्याही निकषांचा विचार न करता तात्काळ मदत जाहिर करावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. ट्विटरवर एक व्हिडिओ संदेश शेअर करत पडळकर यांनी माविआ सरकारवर निशाणा साधला आहे.

कोकणात पावसाने मांडलेल्या हाहाकाराला आता आठवडा लोटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण भागाचा दौरा केला पण अजूनही कोकणातल्या पूरग्रस्त भागातील जनतेला कोणत्याही प्रकारची मदत सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली नाही. यावरून कोकणवासीयांच्या मनात राज्य सरकारविरोधात रोष आहे. तर विरोधी पक्षानेही सरकारला सवाल केला आहे. भाजपाचे आक्रम नेते विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकार विरोधात फटकेबाजी केली आहे.

हे ही वाचा:

भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे

देशासाठी मेडल जिंकलं तरच आम्ही भारतीय ठरतो

मोदी सरकार कर्जबुडव्यांविरोधात उचलणार ‘हे’ कठोर पाऊल

महाराष्ट्रात कारखानदारांच्या भ्रष्टाचाराने जे कारखाने मोडकळीस आल्येत त्यांना वाचवण्यासाठी ३ हजार ८०० कोटी रुपयांची सरकारी तिजोरी उघडायला हे सरकार मागे पुढे पाहत नाही. पण जेव्हा पुराणे उध्वस्त झालेल्या सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण या भागासाठी सरकारला तिजोरी उघडता येत नाही असा हल्लाबोल पडळकर यांनी केला आहे. मागे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात जेव्हा पुर आला होता तेव्हा सरकारने तातडीने मदत केली होती. कुठलाही पंचनामा न करता लोकांना रोखीने पैसे देण्यात आले होते. पण आज हे सरकार फक्त फसव्या घोषणा करत आहे.

आधीच या सरकारच्या लॉकडाऊनच्या खेळात ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले होते. त्यात या पुराने सर्वाना उध्वस्त केले. गावंच्या गावं उध्वस्त झाली आहेत. तेव्हा सरकारने कोणताही निकष न लावता, कोणतेही पंचनामे न करता तात्काळ मदत जाहीर करावी. ज्या व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यांना तात्काळ १ लाख रुपयांची मदत देण्यात यावी. तसेच पुढील दोन वर्षांसाठी त्यांची पाणीपट्टी, घरपट्टी, वीज बिल हे माफ करण्यात यावे. तसेच शेतकऱ्यांनाही हेक्टरी १ लाख रुपयांची मदत जाहीर करावी अशी मागणी पडळकर यांनी केली आहे. तर हे न झाल्यास जनता तुमच्या विरोधात उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Exit mobile version