शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची क्लिप व्हायरल
सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप बरीच गाजत असून त्यांनी संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे कसे शिवसेनेच्या बरबादीस कारण आहेत, याविषयी भाष्य केले आहे. ही क्लिप सध्या भलतीच लोकप्रिय झाली आहे.
आपल्या एका कार्यकर्त्याशी संवाद साधताना शहाजी पाटील म्हणतात की, मी सध्या गुवाहाटीत आहे. काय झाडे, काय डोंगर, काय हॉटेल ओके आहे इथे. कुणाला फोन करू नका असा आदेश होता.
कार्यकर्ता म्हणाला की, तुम्ही घेतलेल्या भूमिकेचे स्वागत केले आहे सगळ्यांनी. चांगला निर्णय घेतला. बापूंना मंत्रिपदाची संधी मिळते. निर्णय आवडला आहे.
हे ही वाचा:
उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?
… म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग
आता आदित्य ठाकरेंची आमदारांना दमदाटी
भगतसिंह कोश्यारींना डिस्चार्ज मिळणार; राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता
त्यानंतर शहाजी पाटील म्हणतात की, उद्धव साहेबांनी गुवाहाटीतील आमदारांच्या भावना लक्षात घ्यायला हव्यात. संजय राऊत यांच्या भावाला आमदार केले नाही, म्हणून ते रागावले. संजय राऊत शपथविधीतून पहिल्यांदा निघून गेले. भावाला मंत्रिमंडळात घेतले नाही म्हणून सूड उगवत आहेत. पवारसुद्धा कसे विसरतील. मैद्याचं पोतं, बारामतीचा म्हमद्या असं म्हटल्यावर ते कसे विसरतील. सेना संपविण्यासाठीच त्यांनी हे केले. पवार साहेबांचे मोठे राजकारण आहे. जगाला गंडवेल आपल्याला गंडवू शकत नाही. यशवंतरावांच्या तालमीत तयार झालेलो आहोत. कराडात आयुष्य गेलंय.
यशवंतराव, वसंतदादा, शंकररावांनंतर एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदेंचं काय नेतृत्व आहे. राजकीय बुद्धिमत्ता, एकूण दिल्लीचं बजेट कसं असतं. कसा विकास व्हायला पाहिजे. कसा गतिमान असला पाहिजे. खरं तर तुम्हाला सांगू का, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्यानंतर एकनाथ शिंदेचे नेतृत्व. माणूस बोलत नाही पण रिझल्ट व्यवस्थित मिळतो. नेतृत्व आव़डलं.
खरं सांगा अडीच वर्षात राष्ट्रवादीने आपलं काय काम केलं. शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली मी काम केले. ते मला मुलगा मानत असत. पण त्यांचे पुत्र अशोक चव्हाणांनी एक तरी आपले काम केले का?