संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना

संतोष बांगर एकनाथ शिंदेंसोबत विधानसभेत रवाना

विधानसभेत शिवसेना आणि भाजपा सरकारची आज बहुमत चाचणी होणार आहे. मात्र, या चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आत्तापर्यंत उद्धव ठाकरेंची बाजू घेणारे आमदार संतोष बांगर हे आज एकनाथ शिंदेकडे पोहोचले आहेत. बहुमत चाचणीपूर्वी उद्धव ठाकरेंना बसलेला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.

हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बागर हे कालपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान दिले होते. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत संतोष बांगर दिसल्याने शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. त्यामुळे आता शिवसेनेसोबत ४० आमदार झाले आहेत. आज सकाळी ते विधानसभेत जाताना एकनाथ शिंदे यांच्यासोबत बसमध्ये चढले.

हे ही वाचा:

 

डेन्मार्कमधील मॉलमध्ये गोळीबार; तिघांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना धक्का; गटनेते एकनाथ शिंदे, प्रतोद म्हणून भरत गोगावलेंना मान्यता

माजी पोलिस आयुक्त संजय पांडेंना ईडीचे समन्स

दरम्यान, उद्धव ठाकरेंना यापूर्वी दोन मोठे धक्के बसले आहेत. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे तर पक्ष प्रतोदपदी भरत गोगावले यांना मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत शिवसेनेच्या आणि काही अपक्ष आमदारांना घेऊन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रविवार, ३ जुलै रोजी झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली असून आता आज होणाऱ्या बहुमत चाचणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version