आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना सर्व राजकीय पक्षांमध्ये आमदार, नेते, कार्यकर्त्यांचे आयाराम-गयाराम सत्र सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (७ ऑक्टोबर) सर्व परतीचे दोर कापले गेल्याचे म्हटले. यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत म्हणाले, त्यांच्याकडे गेलंय तरी कोण?, कोणी मागितला आहे का प्रवेश, आम्हाला तुमच्या पक्षात कुठे यायचे आहे, आहे ते सांभाळा. ‘आम्ही वाघ आहोत, पाळीव प्राण्यासारखं राहुल, सोनिया गांधींपुढे लोटांगण घालत नाही’, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
शिवसेना शिंदे गटाचे युवासेनेचे सचिव दीपेश म्हात्रे यांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला. यावरून उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व आमदार आणि जे पद भोगणारे आहेत त्यांच्यासाठी ‘मातोश्री’ची सर्व दारे बंद झाली आहेत. यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, ठाकरेंनी कशाचे परतीचे दोर कापले, यांच्या पक्षात आहेत तेच जाण्याच्या मनस्थितीत आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षात आयाराम सत्र सुरु आहे, मात्र उबाठामध्ये गयाराम सत्र सुरु आहे.
बुडणाऱ्या पक्षाकडे कोण जाईल, तिकीट देत असले तर येतो अशी दमदाटी करून काही नगरसेवक-कार्यकर्ते पक्षात जात आहेत, यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, आमच्यासाठी नाहीत, असे शिरसाट म्हणाले.
हे ही वाचा :
संविधान हातात घेऊन फिरत असलेल्यांनीच संविधान, लोकशाहीची हत्या केली होती
‘हिंदू मुलींनी’ मुस्लिमांकडून मेहंदी न लावून घेण्याची घेतली शपथ!
प. बंगालमध्ये कोळसा खाणीत स्फोट; सहा जणांचा मृत्यू
स्त्री शक्तीचा जागर: त्यागाचे रूप माई सावरकर
काही शेळ्या आहेत, जे भाजपची गुलामगिरी करत आहेत, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले होते. यावर संजय शिरसाट म्हणाले, आम्ही शेळी नाहीतर वाघ आहोत, पाळीव प्राण्यासारखे दिल्लीला खेटे मारणे, कोण तो राहुल गांधी ज्याच्या जाऊन पाया पडतात, सोनिया गांधीला भेटायचा प्रयत्न करतात पण त्याही भेटत नाहीत, मुख्यमंत्री पदासाठी नाव सांगा म्हणून शरद पवारांना विचारतात, मात्रे ते देखील काही उत्तर देत नाहीत. कितीही लाचारी, लाचारांची ही फौज तयार झाली आहे, असा टोला उद्धव ठाकरेंना संजय शिरसाट यांनी लगावला.