ही लढाई पार्टी फंड किंवा शिवसेना भवन बळकावण्यासाठी नव्हती. पक्षाचं चिन्ह आणि नाव महत्त्वाचं होतं. त्यासाठी लढाई होती. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही. अधिकार सांगणार नाही. शिवसेना भवन आमच्यासाठी मंदिर आहे अशी स्पष्ट भूमिका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मांडली आहे.
शिवसेनेच्या विधिमंडळातील पक्ष कार्यालयावर शिंदे गटाने ताबा मिळवला आहे. शिवालय हे शिवसेनेचे शासकीय कार्यालय घेण्याच्याही जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता शिंदे गट शिवसेना भवनावरही हक्क सांगणार का या विचाराने उद्धव ठाकरे आणि आणि कार्यकर्त्यांच्या गाळण उडाली. हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शिवसेना भवनासमोर शक्तिप्रदर्शनही झाले. शिवसेना भवनावरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटावर टीकाही केली. पण शिरसाट यांनी शिवसेना भवन बळकावण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करत शिवसेना भावनांवर उसनं प्रेम दाखवणाऱ्यांना जोरदार टोला लगावला आहे.
आमदार शिरसाट यांनी माध्यमांसमोर भूमिका मांडली. शिवसेना भवन हे आमच्यासाठी मंदिर आहे. काही लोकांना प्रॉपर्टी वाटत असली तरी आम्ही त्या रस्त्याने गेल्यावर शिवसेना भवनाला नमनच करू. ज्यांना पैशाचा लोभ आहे. त्यांनी बघावं. आमचं ते काम नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जायचं आहे. तोच आमचा अजेंडा आहे असा जोरदार टोला शिरसाट यांनी यावेळी लगावला.
हे ही वाचा:
बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीत जो येईल तो नवी ऊर्जा, प्रेरणा घेऊन जाईल!
११व्या मुलाच्या जन्मानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले…
रुग्ण म्हणून दाखल झाला आणि रुग्णालयातून चोरले महागडे नळ…
मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाय चाटले
शिरसाट पुढे म्हणाले की “आमच्यात प्रामाणिक भावना आहे. आम्हाला पैशाचा लोभ नाही. बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे नेणार आहोत. शिवसेनेने कोणत्याही शाखा विकत घेतलेल्या नाहीत. ट्रस्टच्या माध्यमातून घेतल्या असेल तर ती ट्रस्टची प्रॉपर्टी असेल. मी आमदार आहे. माझंही कार्यालय आहे. माझ्या त्या कार्यालयाचाल शिवसेना हेच नाव राहील. कार्यालयांची आदलबदल होणार नाही. त्यासाठी भांडणं होणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.