शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नसल्याने औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट नाराज असल्याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. आता शिंदे गटाने जाहीर केलेल्या नव्या उपनेते यांच्या यादीतही शिरसाट यांचा समावेश झालेला नाही. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात आणि माध्यमातून चर्चा सुरू झाली आहे.
या सर्व ठिकाणचा समाचार घेताना आमदार शिरसाट यांनी मी नाराज नाही. माझ्याबद्दल जर अशा अफवा पसरवल्या जात असतील तर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
आधी मंत्रिपदापासून वंचित आणि आता शिंदे गटाने जाहीर केलेल्या नेते व नेत्यांच्या यादीत शिरसाट यांच्या नावाचा समावेश केलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर शिरसाठ यांना पक्षातून डावलने जात आहे का? शिरसाट नाराज असल्याबाबतची विधानं केली जात होती. मला काहीही मिळालं नाही तरी चालेल तरी मी शिंदे गटातच राहणार मी एक सच्चा कार्यकर्ता आहे मी काम करतच राहणार असं ठामपणे सांगत शिरसाट यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर पलटवार केला आहे .
शिंदेसाठी मी शिवसेना सोडलीये. मला पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य आहे. मी खूष आहे. नाराज अजिबात नाही. आपल्याला जबाबदारी मिळावी असं प्रत्येक आमदाराला वाटत असतं. मलाही जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा आहे, असंही शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे.अडीच वर्षात या प्रकल्पाला घालवण्यात कुणाचा हात होता ते देखील सांगू असा इशाराही शिरसाट यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी विनेश फोगट पहिली भारतीय महिला
‘नवाब मलिकांच्या निर्दोषतेचा प्रश्नच उद्भवत नाही’
सर विश्वेश्वरय्यांनी अचानक रेल्वेची साखळी खेचली आणि सगळ्यांनाच धक्का बसला
पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोलिस निरीक्षकाने केली होती विकृत पोस्ट
प्रकल्प कुणामुळे गेला खुलासा करणार
वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे विराेधकांकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर सातत्यानं टीका हाेत असल्याचं बघायला मिळत आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी शिरसाट पुढे सरसावल्याचं दिसत आहे. वेदांत प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला याचा लवकरच खुलासा आपण करणार असल्याचा गाैप्यस्फाेट आमदार शिरसाट यांनी केला आहे. त्यामुळे शिरसाट यांच्या खुलाशाचा राेख काेणाच्या दिशेने आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.