भारतीय जनता पार्टीने आमदार रणधीर सावरकर यांना नवी जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता आमदार सावरकर यांना प्रतोद म्हणून नियतयुक्त करण्यात आले आहे. विधिमंडळ पक्ष कार्यालयात विद्यमान मुख्य-प्रतोद व प्रतोद यांना सहाय्य करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे.
आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनापासून रणधीर सावरकर हे प्रतोद ही जबाबदारी पार पडताना दिसतील. आमदार आशिष शेलार हे विधिमंडळात भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रतोद आहेत. तर त्यांना आता रणधीर सावरकर हे सहकारी म्हणून लाभणार आहेत.
हे ही वाचा:
अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशिया राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात चर्चा; या विषयांवर केली चर्चा
ठाकरे सरकाने सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला
राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले
रणधीर सावरकर हे अकोला पूर्व या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आमदार म्हणून निवडून आले आहेत. २०१४ साली ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. तर त्यानंतर २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आपली विजयी घोडदौड चालू ठेवली.