तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही, तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले

ज्याच्या हाती धनुष्यबाण तो रामभक्त. हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळालं नाही, हे तुमचं दुर्दैव आहे

तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही, तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले

खेडमध्ये झालेल्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी नेहमीचे तुणतुणे वाजवत खोके, गद्दार असे नेहमीचे सरावात शब्द वापरत शिंदे गटावर टीका केली. खेडमध्ये ठाकरे यांच्या सभेला झालेलय गर्दीवरूनही चर्चा रंगली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर, टीकेचा शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. तुम्हाला धनुष्यबाण मिळूच शकत नाही. कारण तुमचे हात भ्रष्टचाराने बरबटलेले आहेत. गद्दार, बेईमान चोर, खोके, असं तुम्ही म्हणता. तुमचेच हात बरबटलेले आहेत, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे.

आम्ही रामदास कदमच्या बालेकिल्ल्यात सभा घेतल्याचं समाधान फक्त त्यांनी घेतलं, असं म्हणत रामदास कदम यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर तुम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जात मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? असा सवाल उद्धव ठाकरे यांना केला. बाळासाहेबांनी सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांच्या विचारांशी बेईमानी केली, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलात. त्यामुळे खरी गद्दारी ही तुम्ही केली. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो चोर, असे म्हणालात. ज्याच्या हाती धनुष्यबाण तो रामभक्त. हे पवित्र धनुष्यबाण तुम्हाला मिळालं नाही, हे तुमचं दुर्दैव आहे, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना खडे बोल सुनावले आहेत.

कावीळ असणाऱ्यांना दुनिया पिवळी दिसते
उद्धव ठाकरे यांच्याकडे आता बोलण्यासाठी कोणतेही मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या पावलावर पाऊल टाकत गद्दार, चोर, बेईमान, खोके असं दळण दळत शिंदे गटावर तेच तेच आरोप केले. उद्धव यांच्या या आरोपांना रामदास कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम म्हणाले, खोक्यात आम्ही नाही तुम्ही अडकलात. कावीळ असणाऱ्यांना दुनिया पिवळी दिसते.एखाद्या आमदाराने पैसे घेतल्याचं सिद्ध करा. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहेत. तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. पण एक गोष्ट सांगा. सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? त्यानंतर हिंदुत्वाची भाषा तुमच्या तोंडात शोभते का? शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्यांना असमान्य महत्त्व दिलं. सगळी पदं दिली. स्वतःला पद घेतलं नव्हती. मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही गद्दारी केली अशा शब्दात ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेतला.

हे ही वाचा:

शूटिंग दरम्यान महानायक जखमी

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरमधून हटवा

तुम्हीच बाळासाहेबांचे नाव बाजूला करा

बारावी पेपरफुटी प्रकरणी आणखी दोन जण अटकेत

दुःख, नैराश्याचे दहन करणारा आणि आनंदाचे रंग भरणारा होलिकोत्सव

लोकांना भावनात्मक आवाहन , वागताना हुकुमशहासारखं
एकनाथ शिंदे यांच्या बंदावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला रामदास कदम यांनी जोरदार टोला लगावला आहे. रामदास कदम म्हणाले ,तुम्ही खेडला येऊन चूक केलीत. खेडमध्ये शिवसेना आम्ही उभी केली आहे. मिंध्यांची जीभ हासडून टाकीन असे उद्धव ठाकरे म्हणाले. पण तुमच्यात हिंमत आहे का.. नारायण राणे गेले तेव्हा तुमच्या गाडीत पुढच्या सीटवर रामदास कदमला बसवल्याशिवाय मातोश्रीतून बाहेर पडत नव्हतात. किती केसेस आणि आंदोलनं आहेत, तुमच्यावर? शिवसेना मोठी होण्यासाठी अनेक शिवसैनिकांचे खून झालेत. मी साक्षीदार आहे. बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही बेफाम झाला. शिवसेना नावाच्या प्रायव्हेट कंपनीचा मालक आहे. सगळे नोकर आहेत. असं वागलात. म्हणून इथं लोकांना भावनात्मक आवाहन करतात आणि वागताना हुकुमशहासारखं वागता अशा शब्दात पाणउतारा केला.

Exit mobile version