विरोधी पक्षनेते अजित पवार छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दलच्या धर्मरक्षक या वक्तव्यामुळे अडचणीत आले आहे. त्यांच्यावर चोहोबाजूने टीका करण्यात येत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील औरंगजेब हिंदूद्वेष्टा नव्हता असे वादग्रस्त विधान केले आहे. आव्हाड यांच्या विधानाला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी जोरदार उत्तर दिले आहे. औरंगजेबाबाबत “औरंगजेब क्रूर असता तर विष्णूचे मंदिरही तोडले असते ना?” असे आपण केलेले वक्तव्य स्वाभाविकच आहे, कारण आपली सर्वस्वी श्रद्धा औरंगजेबावर आहे हे केव्हाच सिद्ध झाले आहे, अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे. या संदर्भात राणे यांनी आव्हाड यांना पत्र पाठवले आहे.
आव्हाड हे आपल्या तहआयुष्यात कधीही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर एकदाही नतमस्तक झाले नाहीत किंवा रायगडाच्या दिशेने त्यांचे कधी पाय वळले नाही. काकाप्रमाणे पुतण्याही हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर ‘ नाहीत असे सभागृहात घोषित करतात, अशी टीका राणे यांनी केली आहे. यासंदर्भात राणे यांनी ट्विट करून पत्राची माहिती दिली आहे.
हे ही वाचा:
अजित पवार माफी मागा, नाहीतर महाराष्ट्रात फिरू देणार नाही
अमेय घोले उद्धव गटाकडून शिंदे गटाच्या वाटेवर?
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करताय मग हे वाचाच!
‘विज्ञानामुळे महिलांचे सशक्तीकरण आणि महिलांमुळे विज्ञान सशक्त होते’
राणे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की , औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांना नरक यातना दिल्यातरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदूधर्मासाठी बलिदान दिले. आपल्या माहितीसाठी आपल्याला या पत्रासोबत औरंग्याने तोडलेल्या हिंदू मंदीरांची यादी देत आहे. मला खात्री आहे, आपण हे तथ्य आपल्या मुघलशाहीच्या आस्थेपोटी स्वीकारणार नाही असेही राणे यांनी पत्रात नमूद केले आहे.
To @Awhadspeaks pic.twitter.com/xXOkHbdnpM
— nitesh rane (@NiteshNRane) January 4, 2023
औरंगजेबाने हिंदूची जी तोडलेली मंदीरे आहे त्यात. सोमनाथ मंदीर, कृष्ण जन्मभूमी मंदीर , काशी विश्वनाथ मंदीर, विश्वेश्वर मंदीर, गोविंददेव मंदीर, विजय मंदीर, भीमादेवी मंदीर ,मदन मोहन मंदीर ,चौंसष्ठ योगिनी मंदीर, एलोरा मंदीर, त्र्यंबकेश्वर मंदीर, नरसिंगपूर मंदीर,पंढरपूर या मंदिरांचा समावेश आहे. असे म्हणत राणे यांनी मंदिरांची यादीच आव्हाड यांना पाठवली आहे.