सकाळी उठून रोज माध्यमांसमोर वाटेल ती विधाने करायची आणि प्रकाश झोतात राहाण्याचा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची सवय गेलेले नाही. उद्धव ठाकरेंनी जे जोडे पुसण्याचं वक्तव्य केलं ते योग्यच असल्याचे बरळतानाच संजय राऊत यांनी आता भाजपाला एकनाथ शिंदे सरकारचं ओझं झालं असल्याचे नवीन वक्तव्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपचे नेते नितेश राणे यांनी या विधानानंतर लगेच पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर जोरदार प्रहार केला. मविआवर उद्धव ठाकरेंचं ओझं झाले असल्याचा जोरदार टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
माझ्या माहितीनुसार १ मेची सभा ही मविआची शेवटची सभा असेल. यापुढे वज्रमूठ सभा होणार नाहीत. यावर संजय राऊतांनी स्पष्टीकरण द्यावं असे आवाहन नितेश राणे यांनी दिले आहे. महा विकास आघाडीतच बिघाडी सुरु झाली असल्याचे संकेत नितेश राणे यांच्या या वक्तव्यावरून मिळालेले आहे.
बारसू प्रकल्पाच्या आसपासच्या जमिनी घेतलेल्यांच्या याद्या जाहीर करणार असल्याचे विधान संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केले असून त्याचाही समाचार राणे यांनी घेतला आहे. राऊत म्हणाले की बारसूचे जे जमिनदार आहेत. त्यांच्या याद्या जाहीर करणार आहेत. तर काही याद्या आम्ही देखील जाहीर करु. माजी खासदार निलेश राणे यांनी काही नावे जाहीर केली होती. ज्यामध्ये ठाकरेंची देखील नावे होती. जर संजय राऊत आणि विनायक राऊत यांना आपल्या मालकाला अडचणीत आणायचेच असेल तर त्यांनी जरुर ही नावे जाहीर करावी, असे आवाहन नितेश राणे यांनी राऊत यांना दिले.
जर विनायक राऊत किंवा संजय राऊतांना नावं जाहीर करायचीच असतील, पुन्हा आपल्या मालकाला अडचणीत आणायचंच असेल, तर त्यांनी जाहीर करावं. मग आम्हीही बारसू किंवा आसपासच्या भागात ठाकरेंच्या निगडित लोकांच्या जमिनी कशा आहेत, हे नाव आणि सातबाऱ्यासकट आम्ही जाहीर करणार. त्याचीही तयारी सुरू ठेवावी अशा शब्दात नितेश राणे यांनी संजय राऊत यांना सुनावले.
संजय राऊत स्वतःला शिवसैनिक समजतात. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेची तारीखही माहित नाही. तो शिवसैनिक असण्याच्या बाता करतो. त्याला शिवसेनेबद्दल किंवा बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याचा अधिकार नाही असे सांगत नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्या शिवसेना स्थापनेसंदर्भातील व्हुकीच्या विधानाचा व्हिडीओ माध्यमांना ऐकवला. संजय राऊत हे चायनिज मॉडेल आहे. ओरिजनल नाही अशी खाल्ली उडवत लोकप्रभात असताना बाळासाहेबांना शिव्या घालायचे. संजय राऊत म्हणतात कि, शिवसेनेचा जन्म १९६९ मध्ये झाला. शिवसेनेचा जन्म १९ जून १९६६ मध्ये झालेला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला शिवसेनेबद्दल शिकवत आहे. राऊत डुप्लिकेट आहे असा जोरदार प्रहार केला.
राजकारणातले लवारीस आहेत का?
नागपूरमध्ये कर्करोग रुग्णालय सुरु केल्याबद्दल संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले होते. त्यारूनही संजय राऊत यांना डिवचताना नितेश राणे यांनी एकाच दिवसात फरक पडेल असे वाटले नव्हते. संजय राऊत यांचा चेहरा आज उतरलेला होता. असे त्यांच्याशी लढण्यात मजा नाही. अशा शब्दात खिल्ली उडवली. राऊत यांच्या भोंग्याचा डेसिबल माझ्या पत्रकार परिषदेनंतर कमी झाला असे सांगून नितेश राणे म्हणाले राऊत म्हणायचे मी पवारांचा माणूस आहे. हे उद्धव ठाकरेचे देखील नाहीत आणि शरद पवारांचे देखील नाहीत. मग हे राजकारणातले लावारीस आहेत का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.
हे ही वाचा:
अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू
शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट
आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग
जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता
इतकंही मला हलक्यात घेऊ नका
मी राऊतांना सांगेन की इतकंही मला हलक्यात घेऊ नका. जरा अजून लढण्यात मजा आली पाहिजे. जरा अजून आव आणा, टीका करा. जेणेकरून तुमच्या मालकांनाही कळेल की हा आमचा नाही तर अजून कुणाचा आहे. असा जोरदार प्रहारही नितेश राणे यांनी केला.