बुधवार,८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. त्या सभेला प्रचंड गर्दी झाली होती, असा शिवसेनेने दावा केला होता. मात्र, ही गर्दी शिवसेनेनं पैसे देऊन जमवली, अशी गंभीर टीका भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे.
मुख्यमंत्र्यांचे भाषण MIM ची मतं मिळवण्यासाठी???
एम आय एम च्या खासदार इमतियाज जलील यांनीच तर मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून दिले नव्हते?
नाहीतर औरंगाबादच्या नामांतरावरून दोघांची भाषा एवढी एक कशी असू शकते? pic.twitter.com/aQpdJVALjm— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 9, 2022
औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्धव ठाकरेंची सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरेंनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला होता. त्यावरून भातखळकरांनी त्यांच्यावर टीका केली आहे. एमआयएमच्या खासदार इमतियाज जलील आणि मुख्यमंत्र्यांची नामांतरावरून भाषा सारखीच आहे. एमआयएमच्या खासदार इमतियाज जलील यांनी मुख्यमंत्र्यांना भाषण दिले होते का? असा सवाल भातखळकरांनी उपस्थित केला आहे. तर मुख्यमंत्र्यांचे भाषण हे एमआयएमची मतं मिळवण्यासाठी होते का? असाही सवाल त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
राजीव गांधींचा ‘तो’ फोटो काढणाऱ्या छायाचित्रकाराचे निधन
रोजीरोटी देईन, पाणी, रस्ते देईन तेव्हाच संभाजीनगर नाव होईल!
उत्तर प्रदेशच्या शाळेमध्ये मराठी शिकवली जाणार?
सिद्धू मुसेवाला प्रकरणी, पुण्यातून सौरभ महाकाळला अटक
मुख्यमंत्र्यांच्या सभेला महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिक उपस्थित होते, असे शिवसेनेने दावा केला होता. मात्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये पैसे दिले जात होते. शिवसेनेनं विराट सभेसाठी हा फॉर्म्युला वापरला? अशी गंभीर टीका नितेश राणे यांनी केली आहे. तसेच, ‘Good for NOTHING ’ असं देखील राणे यांनी ट्विट करत, या वाक्यप्रचाराचा खरा अर्थ काल संध्याकाळी संभाजीनगरकरांना सभेनंतर समजलाच असेल! अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
विराट सभेची चा formula ? 😅😅 pic.twitter.com/vlNBzuuU0y
— nitesh rane (@NiteshNRane) June 9, 2022