राज्याच्या विधिमंडळात कचऱ्याचे साम्राज्य

राज्याच्या विधिमंडळात कचऱ्याचे साम्राज्य

राज्यातील लोकशाहीचे मंदिर अशी ओळख असलेल्या राज्याच्या विधिमंडळात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळत आहे राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच मुंबई येथील विधान भवन इमारतीतील कचऱ्याचे फोटो समोर आले आहेत यामुळे सरकारला साधी विधान भवनात ही स्वच्छता ठेवता येत नाही का असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.

सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. २२ डिसेंबरपासून हे अधिवेशन सुरु झाले असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई येथे होत आहे. अशातच अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ इमारतीच्या आवारातील कचऱ्याच्या ढिगाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

हे ही वाचा:

आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो

चिमुरडी लेकरं गमावलेल्या पालकांवर शिवसेना नेत्यांची अरेरावी

काय म्हणता, आता टीव्हीमधून पदार्थांची चव घेता येणार?

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

विशेष म्हणजे आमदारांनीच हे फोटो स्वतः काढले असून ते प्रसिद्ध केले आहेत. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार मिहीर कोटेचा यांनी हे फोटो प्रसिद्ध केले आहेत. कोटेचा हे मुलुंड येथील भाजपा आमदार आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून विधिमंडळातील कचऱ्याच्या खचाचे फोटो टाकले आहेत. विधिमंडळाची हि परिस्थिती असताना मुंबईकरांनी रस्ते आणि परिसर स्वच्छ असतील अशी अपेक्षा कशी करायची? दोन्हीकडे सत्ताधारी एकाच आहेत असे कोटेचा यांनी म्हटले आहे.

तर सरकार विरोधात आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वछ भारत अभियान सारखा उपक्रम राबवत साऱ्या देशाला स्वच्छतेचे मटण पटवून देत असतानाच ठाकरे सरकारचे मात्र विधिमंडळातील कचऱ्याकडेच लक्ष्य नसल्याचे मत व्यक्त होताना दिसत आहे.

Exit mobile version