25 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारण"मौलवी, फादर विरोधात बोलायची हिंम्मत आहे का?" मंगल प्रभात लोढा कडाडले

“मौलवी, फादर विरोधात बोलायची हिंम्मत आहे का?” मंगल प्रभात लोढा कडाडले

Google News Follow

Related

मालाड मालवणातील हिंदू अत्याचाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र विधानसभेचे वातावरण चांगलेच तापले. भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावरून सरकारला घाम फोडला. मालवणीत राहणाऱ्या हिंदूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत ते सरकारवर चांगलेच बरसले. ‘न्यूज डंका’ ने पहिल्या दिवसापासूनच मालवणी विषयात आवाज उठवला असून त्याचा पाठपुरावा केला आहे. आज आमदार लोढांच्या निमित्ताने याला विधानसभेतही वाचा फोडली आहे.

आसाम, कैराना, काश्मीर इथल्या हिंदू अत्याचाराच्या आणि पलायनाच्या कथा आपण ऐकल्या आहेत. पण आता अशाच घटना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात मालाडमधील मालवणी मध्ये घडत आहेत.

पोलिसांनीच फाडले राम मंदिराचे बॅनर
गेला महिनाभर संपूर्ण भारतात राम मंदिरासाठी निधी संकलन सुरु होते. पण तेव्हा मालवणीत मात्र राम मंदिराचे बॅनर पोलिसांकडूनच फाडले गेले असा गंभीर आरोप आमदार लोढा यांनी केला आहे. पोलिसांच्या या कृत्याविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आल्याचेही लोढा म्हणाले. महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठतो तरीही त्याच्या विरोधात एफआयआर होत नाही. पण प्रभू श्रीरामांचे बॅनर्स फाडल्यावर आवाज उठवणाऱ्यांना सहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवतात आणि त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला जातो असे म्हणत लोढा यांनी गृह खात्याच्या कारभारावर ताशेरे ओढले.

पाच वर्षात कमी झाले पंधरा हजार हिंदू मतदार
आमदार लोढा यांनी मालवणीतील पसरिस्थिती समजावण्यासाठी मतदार यादीचा आधार घेतला. गेल्या पाच वर्षांच्या परिस्थितीचा विचार केला तर मालवणीतील हिंदू मतदारांची संख्या ही पंधरा हजारांनी कमी झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला मुस्लिम मतदारांची संख्या मात्र बारा हजारने वाढली आहे.

हे ही वाचा:

मुख्यमंत्र्यांच्या ‘राहुल गांधीगिरीचे पोस्टमॉर्टम’

छेडा कॉम्प्लेक्सची कथा
मालवणीतील छेडा कॉम्प्लेक्स या इमारतीत पाच वर्षांपूर्वी १०८ कुटुंबे राहात होती. ती सारी कुटुंबे हिंदू होती. आजही छेडा कॉम्प्लेक्स मध्ये १०८ कुटुंबेच वास्तव्य करतात पण त्यातले फक्त ७ परिवार हिंदू राहिले आहेत. बाकीचे १०१ परिवार मुस्लिम आहेत. छेडा कॉम्प्लेक्सच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर अनधिकृत मशीद उभारली आहे. छेडा कॉम्प्लेक्स हिंदुविहीन करण्यात याचा मोठा वाटा आहे.

नमाजच्या वेळी दलित महिलांना त्रास
छेडा कॉम्प्लेक्सच्या जवळच एक चाळ आहे. तिथे एकूण ५६ दलित कुटुंब राहात होती. पण आता तिथे फक्त सहा दलित कुटुंब राहिली आहेत. ह्या कुटुंबाना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. या परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृह आहे. नमाजच्या वेळी कोणता व्यत्यय येऊ नये म्हणून महिलांना या प्रसाधनगृहात कोंडण्यात येते. अशी धक्कादायक माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली. या गोष्टी मालवणी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर आहेत असेही लोढा म्हणाले.

हे ही वाचा:

“…तर तुम्ही खूनच केला असता”- सुधीर मुनगंटीवार

मालवणी पॅटर्न थांबला नाही तर महाराष्ट्रातला हिंदू अल्पसंख्यांक होईल
भविष्यात जर मुंबईतला, महाराष्ट्रातला हिंदू जर अल्पसंख्यांक झाला तर त्याची सुरुवात ‘मालवणी पॅटर्न’ पासून झाली असे म्हणावे लागेल असा घाणाघातही लोढा यांनी केला. महाराष्ट्रात हिंदू घाबरून राहतो. पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या होते आणि महाराष्ट्र सरकारचा मंत्रीच म्हणतो की साधू नालायक असतात. या विरोधात मी स्वतः तक्रार केली आहे. पण त्यावर अजून कोणतीही कारवाई केली नाही. मौलवी आणि फादर विरोधात हे बोलायची हिंम्मत आहे का? असा सवालही लोढा यांनी उपस्थित केला.

एकेकाळी काश्मीर हिंदू बहुल होता. पण तिथल्या पंडितांवर अन्याय करत त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले गेले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला असे म्हणत त्यांचे अभिनंदनही आमदार लोढा यांनी आपल्या भाषणातून केले.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा