24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाअपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

अपहरणप्रकरणी आमदार एचडी रेवण्णा यांना वडील देवेगौडा यांच्या घरातून अटक

अपहरणाच्या गुन्ह्यात अटक

Google News Follow

Related

जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) आमदार एचडी रेवण्णा यांना कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केली. त्यांना त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यांची नियमित वैद्यकीय चाचणी घेण्यात आली असून आज, रविवारी त्यांना न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येणार आहे.

अपहरण प्रकरणात अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे, अशी विनंती बेंगळुरू न्यायालयाने फेटाळल्यानंतर कर्नाटक पोलिसांच्या पथकाने एचडी रेवण्णा यांना लगेच ताब्यात घेतले. रेवण्णा यांच्या सहकाऱ्याने २० वर्षीय तरुणाच्या आईचे अपहरण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे एचडी रेवण्णा यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार राजू एचडी हे त्यांच्या आईसोबत रेवण्णा यांच्या फार्महाऊसवर घरकाम करत होते.

रेवण्णा यांचा नातेवाईक सतीश बबन्ना याने २९ एप्रिल रोजी या महिलेचे तिच्या घरातून अपहरण केले होते आणि कालेनल्ली येथील आमदारांचे निकटवर्तीय सहाय्यक राजशेखर यांच्या फार्महाऊसवर तिला बंदिस्त केले होते. आदल्या दिवशी कर्नाटक पोलिसांनी या महिलेची सुटका केली होती.

रेवण्णा यांच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३६४ए (अपहरण) आणि कलम ३६५ (जबरदस्ती प्रतिबंध) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि कर्नाटक पोलिसांनी अजामीनपात्र कलमे लावली होती. एचडी रेवण्णा आणि त्यांचा मुलगा प्रज्वल रेवण्णा यांच्यावर लैंगिक अत्याचार आणि या कृत्याचे चित्रीकरण केल्याचे गंभीर गुन्हे आहेत. एचडी रेवण्णा आणि प्रज्वल यांच्या विरोधात विशेष तपास पथकाने लूकआउट नोटीस जारी केली होती. प्रज्वल यापूर्वीच परदेशात गेला आहे.

हे ही वाचा:

किराणा दुकानात विकत होता ड्रग्ज; पोलिसांकडून ४ कोटी ५० लाख ७० हजारांचे ड्रग्ज जप्त

सलमान खान हल्ला प्रकरणी आरोपीच्या आत्महत्येबाबत कुटूंबीय न्यायालयात

‘काँग्रेसला औरंगजेबाचा जिझिया कर लागू करायचा आहे’

पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत!

प्रज्वल रेवण्णा याचा समावेश असलेल्या स्पष्ट व्हिडिओ क्लिप अलीकडच्या काही दिवसांत हसनमध्ये व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने खासदाराच्या कथित सेक्स स्कँडलच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा