मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवास

मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना तुरुंगवास

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष देवेंद्र भुयार यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारण तीन वर्षांपूर्वी भुयार यांनी गटविकास अधिकाऱ्यावर माईक आणि पाण्याची बाटली फेकली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. यावरून त्यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १५ हजार दंड ठोठावला आहे. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे भुयार यांनी म्हटले आहे.

२८ मे २०१९ रोजी देवेंद्र भुयार यांनी गटविकास अधिकारी सुभाष बोपटे यांच्यावर पाण्याच्या प्रश्नावरून माईक आणि पाण्याची बाटली फेकल्याचा आरोप केला होता. त्यावेळी भुयार हे जिल्हा परिषद सदस्य होते. त्यावेळी अमरावती जिल्ह्यातील गोडसे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमवार,६ जून रोजी याच प्रकरणाची सुनावणी झाली आहे. सुनावणी झाल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एस.एस. अडसर यांनी भुयार याला तीन महिने कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास भुयारला एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

हे ही वाचा:

५० लाख खर्च केले पण विजयदुर्ग दयनीयच!

दूरदर्शनचा आवाज काळाच्या पडद्याआड; प्रदीप भिडे यांचे निधन

नेदरलँड्सचे खासदार विल्डर्स आखाती देशांवर बरसले; ते टीकेच्याच लायक आहेत…

कांजूरमार्ग मेट्रो कारशेडची जमीन केंद्राचीच!

दरम्यान, अमरावतीतील अनेक लोकप्रतिनिधी हे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. त्यातील काहींना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. त्यात आता भुयार यांची भर पडली आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यांनाही पोलिस शिपायाच्या मुस्कटात मारल्याबद्दल शिक्षा सुनावली होती.

Exit mobile version