कांदिवली पूर्व विधानसभेतील गोरगरीब बांधवांना अन्न मिळावे यासाठी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी एक मानवतावादी उपक्रम सुरू केला आहे. अनुकंपा वेलफेअर असोसिएशनमार्फत रोटी बँक उपक्रम राबविण्यात आला आहे.
तहानलेल्या पाणी, भूख लागलेल्याला अन्न देणं याहून श्रेष्ठ धर्म नाही. प्रत्येकाला अन्न मिळायला हवे आणि तो त्याचा अधिकार आहे. आज आपल्या आसपास अनेक लहान मुलं भूख लागली म्हणून भीक मागताना दिसतात. या मुलांना वेळेवर अन्न मिळाले तर ही मुले शाळेत जाऊन आपलं भविष्य उज्वल करू शकतात. भुकेमुळे आजारी पडणाऱ्यांची संख्याही कमी होईल याच हेतूने आमदार अतुल भातखळकर यांच्या माध्यमातून अनुकंपा वेलफेअर असोसिएशनमार्फत रोटी बँक हा उपक्रम सुरू होत आहे.
कांदीवली पूर्व विधानसभेत गोरगरीब बांधवांसाठी आणखी एक मानवतावादी उपक्रम रोटी बॅंक…. pic.twitter.com/Ga6rqnjHyT
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 12, 2023
हे ही वाचा :
फक्त राजीनामा नाही, ही चूक सुद्धा उद्धवना भोवणार!
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयचा छापा
“अध्यक्षपदाच्या राजीनाम्याबद्दल कल्पना नसल्याचे अजित पवार खोटं बोलत आहेत”
३० हजार पगारी इंजिनीअरचा लाखोंचा थाट!
दोन वेळेचं अन्न न मिळाणाऱ्यांना सन्मानाने अन्न मिळावे यासाठी हा उपक्रम आहे. शनिवार, १३ मे रोजी ६ वाजता कामगार रुग्णालयाच्या समोर, आकुर्ली रोड, कांदिवली येथे या उपक्रमाचे उदघाटन होणार आहे. याचे उदघाटन रेस्क्यू फाउंडेशनचे सह संस्थापक त्रिवेणी बेन आचार्य यांच्या हस्ते होणार असून खासदार गोपाळ शेट्टी, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेश जैन हे उपस्थित असणार आहेत.
अनेकांकडे खायला अन्न नसते. अशांना रोटी बँकेकडून अन्न दिले जाते. या उपक्रमांतर्गत हॉटेल, रेस्टॉरेंट, सार्वजनिक समारंभातून शिळे अन्न घेऊन वितरित करण्यात येत नाही.