महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे गुजरातमध्ये असल्याची माहिती असून शिवसेनेच्या गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. यावरून काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून अजून खळबळ माजवली. त्यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून शिवसेनेचे नावही हटवत एक ट्विट केले आहे. त्या ट्विटवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा वारसा समर्थपणे आपणच पुढे नेणार आहोत याची ग्वाही दिली आहे.
याचा अर्थ हा वारसा पायदळी तुडवला जात होता. pic.twitter.com/VOqAxAef5p— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2022
एकनाथ शिंदे यांनी, आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. तसेच बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीची आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, अशा प्रकारचे त्यांनी ट्विट केले होते. त्यावर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ” एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे साहेब यांचा वारसा समर्थपणे आपणच पुढे नेणार आहोत याची ग्वाही दिली आहे. याचा अर्थ हा वारसा पायदळी तुडवला जात होता,” असे ट्विट भातखळकरांनी केले आहे.
हे ही वाचा:
“एकनाथ शिंदेंचा विषय शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा”
‘धर्मवीर’चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत!
पंतप्रधान मोदींनी म्हैसूर पॅलेस मैदानावर केला योग
गटनेतेपदावरून हटवल्यावर एकनाथ शिंदेंनी ट्विटरवरून ‘शिवसेने’ला हटवले
दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेसोबत चर्चा करण्यासाठी गुजरातला रवाना झाले आहेत. एक दिवसापूर्वी विधानपरिषद निडवणुकीचा निकाल जाहीर झाला. या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल होते. त्यांनतर सुरतमध्ये मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनाच भेटण्यासाठी शिवसेनेचे नेते गुजरातला रवाना झाले आहेत.