24 C
Mumbai
Friday, November 22, 2024
घरराजकारणमंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? - अतुल भातखळकर

मंत्री म्हणून तुम्ही फक्त खंडणीखोरीतच मग्न होतात का? – अतुल भातखळकर

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन फोन टॅपिंग प्रकरण उघडकीस आणले आणि ठाकरे सरकारमध्ये एकच गोंधळ उडाला. बुधवारी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या प्रकरणाचे पडसाद उमटलेले दिसले. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी या प्रकरणावर उलट सुलट प्रतिक्रिया दिल्या, तर त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या मंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर व्यवहारांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाची कागदपत्र पत्रकारांसमोर मांडली आणि ६.३ जीबीचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय पत्रकार परिषद झाल्यावर हा डेटा घेऊन दिल्लीला केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या डेटामधून त्यांनी फोन टॅपिंग आणि त्यातून होणारा बदल्यांचा भ्रष्टाचार उघड होत असल्याचेही सांगितले.

हे ही वाचा:

आंतरराष्ट्रीय उड्डाणांना एप्रिल पर्यंत स्थगिती

वाझे ठरतोय लादेन मार्गी

प्रकरण गंभीर, पण राऊत खंबीर

देशात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे महाराष्ट्रातले

फडणवीसांचे हे आरोप ठाकरे सरकारच्या चांगलेच जिव्हारी लागले असून राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचे पडसाद उमटलेले दिसले. बुधवारी झालेल्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांच्या या आरोपांना घेऊन चर्चा झाली. सरकारचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण अधिकाऱ्यांना ओळखायला कमी पडलो असा सुर आळवला. अधिकाऱ्यांवर विश्वास कसा ठेवायचा? असा सवालही ठाकरेंनी विचारला. आपण सगळ्यांनी एकत्रपणे लढले पाहिजे आणि फडणवीसांचे मुद्दे खोडून काढले पाहिजे असे उद्धव ठाकरे म्हणाले. तर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी फोन टॅप होत असेल तर आपण काम कसं करणार? असा सवाल उपस्थित केला. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी थेट राज्याच्या गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुख असेलल्या रश्मी शुक्ला यांच्यावरच आरोप केले. रश्मी शुक्ला हे फोन टॅपिंग करत होत्या हे माहीतच नव्हते. त्यांनी एका नावाने फोन टॅपिंगची परवानगी घेतली आणि दुसऱ्याच लोकांचे टॅपिंग केले. शुक्ला यांनी केलेले फोन टॅपिंग बेकायदेशीर आहे असे आव्हाडांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांच्या या प्रतिक्रियेवरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. “जितेंद्र आव्हाडांनी जी मुक्ताफळे उधळली त्यावर हसावे की रडावे हेच समजत नाही. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे टॅपिंग केले आणि अनिल देशमुखांनी त्यांना माफ केले असे आव्हाड म्हणाले. पण जर शुक्ला बेकायदेशीरपणे टॅपिंग करत असतील तर त्यांना माफ करण्याचा अधिकार देशमुखांना कोणी दिला? त्यामुळे या विषयात देशमुखांनीच राजीनामा दिला पाहिजे. रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षी फोन टॅप केले हे तुम्हाला जर ह्यावर्षी कळत असेल तर तुम्ही सत्ता करायच्या लायकच नाही.” असा घणाघात भातखळकरांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा