ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच पुण्याई – आमदार अतुल भातखळकर

ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच पुण्याई – आमदार अतुल भातखळकर

भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या मतदारसंघातील जेष्ठ नागरिकांच्या कोविड लसीकरणासाठी विशेष बस सेवा सुरु केली आहे. ही बस सेवा पूर्णपणे मोफत आहे. कोविडमुळे महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झालेली आहे. अशा परिस्थितीत मतदारसंघातील जेष्ठ नागरिकांचे लसीकरण हे सुलभ पद्दतीने व्हावे आणि त्यासाठी त्यांना गर्दीतून प्रवास करावा लागू नये यासाठी आमदार अतुल भातखळकर यांनी ही बस सेवा सुरु केली आहे.

भाजपा नेते अतुल भातखळकर हे कांदिवली पूर्व विधानसभेचे लोकप्रिय आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील जेष्ठ नागरिकांना कोविड लसीकरणासाठी दहिसर येथील कांदरपाडा परिसरातील लसीकरण केंद्रावर जाणे गरजेचे होते. कांदिवली ते दहिसर हा प्रवास करणे या जेष्ठ नागरिकांना सुकर आणि सुखरूप व्हावे यासाठी आमदार भातखळकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या प्रभागातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत अशी बस सेवा सुरु केली. या बस सेवेचा शुभारंभ १३ मार्च रोजी झाला. या वेळी भाजपा कांदिवली पूर्व मंडळ अध्यक्ष आप्पा बेलवलकर, सरचिटणीस संजय जैस्वाल, वार्डाध्यक्ष नितीन चौहान यांसह अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. या बस सुविधेच्या पहिल्या टप्प्यात पाच हजार नागरिकांना हे मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचा आमदार अतुल भातखळकर यांचा मानस आहे.

” ‘ज्येष्ठांचा आशीर्वाद हीच पुण्याई’ मानून या सुविधेअंतर्गत पहिल्या टप्प्यात किमान पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा मानस असून, लवकरच कांदिवली पूर्व व मालाड पूर्व परिसरात कोरोना लसीकरण केंद्र सुरू व्हावे, या करिता प्रयत्नशील आहे.” असे अतुल भातखळकर यांनी या उपक्रमाविषयी बोलताना सांगितले.

हे ही वाचा:

सचिन वाझेंना अडकवणारे अधिकारी कोण?

एपीआय वाझेंना तात्काळ निलंबित करा – आमदार अतुल भातखळकर

सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी

Exit mobile version