ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

ठाकरे सरकारच्या या चुकीला माफी नाही!

मागील ५ दिवसांपासून कोकणात पूरसदृश परिस्थिती असताना आणि गुरुवारी दोन ठिकाणी दरड कोसळली असताना सुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले. त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यामुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हे अत्यंत संतापजनक असून मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या या अनास्थेची व दिरंगाईची न्यायिक चौकशी करण्याची मागणी भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. ठाकरे सरकारने केलेल्या या अक्षम्य दिरंगाईला आणि चुकीला माफी नाही, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.

आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटले आहे की, पुरामुळे महाराष्ट्राच्या नाका-तोंडात पाणी जात असताना नौदलाला-लष्कराला पाचारण करायला ठाकरे सरकारने एवढा वेळ का काढला? मुख्यमंत्र्यांच्या सुस्त कारभारामुळे केवळ प्रशासन ठप्प झाले नसून लोकांचे बळी जाऊ लागलेत. ही दिरंगाई अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही.

हे ही वाचा:

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची विजयी सलामी

श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी

लडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय

संकटाच्या काळात जनतेला पाठ दाखवणारे कसले पालक मंत्री? हे तर पळपुटे मंत्री!

पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात, राज्य सरकारकडून त्यांना आदेश येताच ते तात्काळ मदतकार्य सुरू करतात. बुधवारी रात्रीपासून संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले असताना व गुरुवारी सकाळी तळीये येथे दरड कोसळली असताना राज्य सरकारने तात्काळ तटरक्षक दल व नौदलाला मदतीसाठी लेखी आदेश देण्याची आवश्यकता होती, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारीच मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली व आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. परंतु निष्क्रिय व घरबशा ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी २४ तास लागले. ही दिरंगाई अक्षम्य असून अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येणार आहे? असा सवाल सुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.

Exit mobile version