अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अतुल भातखळकरांनी डिवचले

अतुल भातखळकरांची सुषमा अंधारेंवर टीका

अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अतुल भातखळकरांनी डिवचले

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या माध्यमांसमोर हिंदुत्वाचे महत्व स्पष्ट करताना बऱ्याच दिसत असतात. याच सुषमा अंधारेंवर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. ‘अस्सलाम वालेकुम लाचारांनो’ असं म्हणत अतुल भातखळकर यांनी सुषमा अंधारेंचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

सिल्लोड येथील सुषमा अंधारेंच्या सभेचा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये सुषमा अंधारे कुराणाविषयी बोलत आहेत.

त्या व्हिडीओमध्ये अंधारे म्हणाल्या, कुराण शरीफमध्ये सांगितलं आहे की, इस्लाममध्ये पाच कर्तव्य सांगितली आहेत. खरा मुस्लीम तोच असतो जो दिवसांतून पाचवेळा नमाज पठण करतो. दुसरे कर्तव्य रमजानच्या पवित्र महिन्यात रोजे पाळणे हे आहे. तिसरे कर्तव्य आपल्या कमाईतील २० टक्के जकातमध्ये देणे. चौथे कर्तव्य आयुष्यात एकदा हजला जाणे आणि पाचवे कर्तव्य म्हणजे जेव्हा अल्लासमोर तुमच्या कामांचा हिशोब द्यायची वेळ येईल तेव्हा तुमची मान लज्जेने खाली झुकायला नको.

हे ही वाचा : 

उद्धव ठाकरे गटाला पडणार पुन्हा खिंडार, कोण कोण जातंय?

इंडोनेशिया भूकंपाने हादरले, शेकडो घरांची पडझड , १६२ ठार

फिजियोथेरेपीस्ट नव्हे हा तर रेपिस्ट

‘युवाशक्तीचा राष्ट्र उभारणीत वापर व्हावा’

अशी कुरानाविषयी सविस्तर माहिती सुषमा अंधारेंनी भाषणामध्ये दिली होती. त्यांचा हा व्हिडिओ अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ही ज्वलंत हिंदुत्वाचा वसा सांगणाऱ्या जनाब सेनेची सभा चालली आहे. अस्सलाम वालेकुम लाचारांनो, अशी टीकाही यावेळी ठाकरे गटावर केली आहे. दरम्यान, सध्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रा करत आहेत. या यात्रेतून त्या शिंदे- फडणवीस सरकारवर टीका करत आहेत.

Exit mobile version