‘राऊतांप्रमाणे गैरकारभाराचे ५५ लाख कधी चंद्रकांत दादांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत’

‘राऊतांप्रमाणे गैरकारभाराचे ५५ लाख कधी चंद्रकांत दादांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत’

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर सव्वा रुपयाच्या मानहानीचा दावा करण्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांना चिमटा काढला आहे.

त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, चंद्रकांत पाटलांची बायको किंवा त्यांच्या अकाऊंटला बँक खात्यातून गैरकारभाराचे ५५ लाख वळते करावे लागले नव्हते. त्यांना ईडीच्या चौकशीला किंवा लाचलुचपत खात्याला सामोरे जावे लागले. त्यामुळे भाजपाकडून दळभद्री आरोप होत आहेत असे म्हणण्यापेक्षा जे अनंत गिते यांनी सांगितले आहे, ते सत्य आहे, हे लक्षात घ्यावे. संजय राऊत जो थयथयाट करत आहेत, तो त्यांनी कमी करावा आणि मुख्यमंत्र्यांना सांगावे की महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार रोज वेगाने वाढत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात जे शक्ती कपूर आहेत. त्यांच्यावर प्रथम कारवाई व्हावी.

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या पत्रात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर शरसंधान केले आहे. पीएमसी बँकेतील पैसे राऊत यांच्या पत्नीला मिळाल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी चंद्रकांत दादा यांच्यावर सव्वा रुपयाचा मानहानीचा दावा करण्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या ताफ्यात ‘बॉडी’गार्ड

राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत ‘घोड्यां’ना जिंकण्याचा मार्ग मोकळा

भारताच्या ‘वॅक्सिन’ मुत्सद्देगिरीला यश

पुण्यातील गिर्यारोहकांनी सर केली ६५१० मीटर उंची

संजय राऊत यांनी त्याआधी ‘सामना’मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करणारा लेख लिहिला होता. त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्र पाठवून राऊत यांच्या या लेखाला उत्तर दिले होते.

Exit mobile version