28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारण‘गांधींचे पुतळे उखडा आणि नथुरामचे बसवा म्हणणारे भुजबळ आज काँग्रेससोबत आहेत’...  

‘गांधींचे पुतळे उखडा आणि नथुरामचे बसवा म्हणणारे भुजबळ आज काँग्रेससोबत आहेत’…  

Google News Follow

Related

आमदार अतुल भातखळकर यांची टीका

महात्मा गांधींचे पुतळे उखडा आणि तिथे नथुराम गोडसेचे पुतळे बसवा, असे म्हणणारे छगन भुजबळ आज काँग्रेससोबत आहेत, अशा शब्दांत भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. गांधी जयंतीच्या दिवशी ट्विटरवर नथुराम गोडसे यांच्या नावाने ट्रेंड सुरू आहे, त्या मुद्द्यावरून भातखळकर यांनी नाराजी प्रकट केली. या ट्रेंडसंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधत या विचारसरणीला पाठिंबा दिला जात असल्याचे म्हटले होते. त्यावर आमदार भातखळकर यांनी म्हटले की, सचिन सावंत आणि संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. सावंत यांना आमदार होता येत नाही म्हणून त्यांनी संतुलन गमावले आहे. यांच्याकडे दुर्लक्ष करणे बरे. यावर चर्चा करायची तर ज्या छगन भुजबळांनी म्हटले होते की, महात्मा गांधी यांचे पुतळे उखडा, नथुरामांचे पुतळे बसवा. पण असे म्हणणाऱ्या भुजबळांना काँग्रेसने आज पावन करून घेतले. त्यामुळे सचिन सावंत यांनी उगाच नाकाने कांदे सोलू नयेत.

महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी नथुराम गोडसे नावाचा ट्रेंड सध्या ट्विटरवर दिसतो आहे. त्याबद्दल विविध स्तरातून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही या ट्रेंडबद्दल नाराजी प्रकट केली आहे.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये कॅप्टन स्वतःची वेगळी ‘इनिंग’ सुरु करणार

… म्हणून वाडा कोलमची अस्सल चव राहणार टिकून!

मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही… का म्हणतोय काँग्रेसचा नेता?

“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

हे कृत्य बेशरमपणाचे आहे. जे ट्विटर कायम अनेकांच्या ट्विटरवर कायम आक्षेप घेतात त्यांनी हे काढून टाकावे. महाराष्ट्राच्या गृहखात्याच्या आयटी विभागाने जे कुणी असे ट्रेंड चालवत असतील त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करायला हवी. भाजपा, सर्व समाज, सर्व संघटना आदरांजली वाहात असताना असे ट्रेंड चालविले जात असतील तर त्यावर कारवाई केली जायला हवी.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा