राहुल गांधींना शिक्षा ही काँग्रेस सरकारच्या काळातील कायद्यानुसारच, मग ढोंग कशाला?

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अधिवेशनात विचारला परखड सवाल

राहुल गांधींना शिक्षा ही काँग्रेस सरकारच्या काळातील कायद्यानुसारच, मग ढोंग कशाला?

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिडला यांनी घेतल्यानंतर त्यासंदर्भातल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात सभात्याग केला. त्याबद्दल भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी परखड टीका केली.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, विरोधी पक्षाच्या लोकांनी त्यांचे नेते राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे लोकसभा सदस्यत्व रद्द झालं. या नावाखाली सभात्याग केला. खरे तर, त्यांच्याच काळात २०१३ला हा कायदा संसदेने मंजूर केला. कुठल्याही खासदार किंवा आमदाराला २ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द होते. भाजपाच्या आग्रहामुळे पण त्यांच्या सरकारच्या काळात हा कायदा झाला. त्यांच्या नेत्याला शिक्षा झाली तर सभात्याग करणे हा केवळ ढोंगीपणा आहे.

हे ही वाचा:

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी गेली; दोन वर्षांच्या शिक्षेमुळे कारवाई

वॉशिंग्टनमध्ये काश्मीर मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या पाकिस्तानींना हाकलून लावले!

पासपोर्ट मिळाला नाही..अमृतपाल परदेशात पलायन करणार ?

जाणून घ्या आजच्या ‘मत्स्य जयंतीबद्दल’

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणात त्यांना सूरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्या पार्श्वभूमीवर हे सदस्यत्व रद्द करण्यात आले. मोदी नावाचे सगळे चोर कसे असतात, असे आक्षेपार्ह विधान राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात केले होते. त्यावरून त्यांच्यावर गुजरात येथे खटला दाखल करण्यात आला होता.

मोदी समाजाच्या लोकांची ही बदनामी आहे, असा आरोप करत ही याचिका करण्यात आली होती. त्यावर मग गुरुवारी राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावण्यात आली तसेच त्यांना जामीनही मंजूर झाला. त्याच अनुषंगाने नियमानुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आमदार किंवा खासदाराला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली की, त्याला त्याचे सदस्यत्व गमवावे लागेल असा नियम करण्यात आला आहे. त्याप्रमाणे ही शिक्षा करण्यात आली आहे.

Exit mobile version