29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारण'मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर'

‘मुंबईची पुन्हा होणार तुंबई; फक्त ७५ टक्के नालेसफाई करण्याचे टेंडर’

Google News Follow

Related

आमदार अतुल भातखळकर यांनी समोर आणले वास्तव

उशिरा काढलेल्या नालेसफाईच्या कंत्राटामध्ये पावसाळ्यापर्यंत अवघी ७५ टक्के नालेसफाई करायची, असा नियम घालून मुंबई महानगरपालिकेने पुन्हा एकदा मुंबई तुंबण्याची व्यवस्था मुंबईकरांसाठी केली आहे, असा सनसनाटी आरोप भाजपा नेते व मुंबई भाजपाचे प्रभारी तसेच आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

कांदिवली पूर्व येथील पोयसर व अन्य नाल्यांचा पाहणी दौरा केल्यानंतर त्यांनी या गोष्टी निदर्शनास आणल्या.

हा पाहणी दौरा केल्यानंतर ते म्हणाले की, उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे विधान किती पोकळ आहे. टेंडरमध्ये हे म्हटले आहे की, मान्सून सुरू व्हायच्या आधी म्हणजे ७ जूनआधी १०० टक्के नालेसफाईची अपेक्षित नाही तर फक्त ७५ टक्के नालेसफाई व्हायला हवी. खरेतर, १ मार्चला नालेसफाईचे टेंडर काढून त्याचे कंत्राट दिले गेले पाहिजे. कारण पावसाआधी तीन महिने नालेसफाई व्हायला हवी. पण हे टेंडर काढण्यात आले ते १ एप्रिलनंतर. म्हणजे एक महिना वाया गेला. शिवाय, त्यात ७५ टक्केच नालेसफाई व्हायला हवी, असे नमूद केले आहे. पालिकाच म्हणत असेल की, ७५ टक्के नालेसफाई करा, १०० टक्के नको. येणाऱ्या डिसेंबरमध्ये पूर्ण काम करायचे आहे. तेव्हा मुंबईची तुंबापुरी होणार आहे. आता तर पालिकाही बरखास्त आहे, स्थायी समिती नाही. त्यामुळे या लोकांनी यात किती घपले केले त्याचीही चौकशी व्हायला हवी. पण २० टक्केही काम आता होणार नाही. ७५ टक्के तर राहू द्या.

हे ही वाचा:

बंगालमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, हत्या; TMC नेत्याचा मुलगा आरोपी

५८ कोटी कुठले, एवढेच पैसे दिले सोमय्यांनी

अभिनेते, पटकथा लेखक शिव सुब्रमण्यम यांचे निधन

झारखंडमध्ये रोपवेच्या ट्रॉली धडकून अपघात; तीन जणांचा मृत्यू

 

भारतीय जनता पार्टीतर्फे माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजातील मान्यवर यांची एक दक्षता समिती स्थापन करण्यात येणार असून त्या माध्यमातून प्रत्येक नाल्याची तपासणी करण्यात येईल, असेही आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. तसेच ज्यांना कंत्राट मिळाले आहे त्यांना अधिक यंत्रसामुग्री देण्यात यावी व काम अत्यंत गतिमान पद्धतीने व्हावे, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना भेटून सांगणार असल्याचेही आमदार भातखळकर यांनी म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा