नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले आहे. सभेमध्ये अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणी जयंत पाटील यांना शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती.
जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून भातखळकर यांनी टीका केली होती आणि पाटील यांना शिक्षा करावी अशी मागणी केली होती. अतुल भातखळकर म्हणाले, सभागृह परंपरा आणि कायद्याने चालते. सभागृहामध्ये सर्वोच्च हे अध्यक्ष असतात. त्यामुळे अध्यक्ष ठरवतील ते अंतिम असते. आम्हालाही अध्यक्ष बोलू देत नाहीत, मग काय आम्हीपण अध्यक्षांवर आरोप करायचे का? बोलू देत नाहीत म्हणून अध्यक्षांसाठी अपशब्द वापरायचे का? असे सवाल अतुल भातखळकर यांनी केले.
जयंत पाटील यांच्यासारख्या वरिष्ठ सदस्यांनी अशा पद्धतीने वागणं चुकीचं आहे. त्यामुळे याची शिक्षा त्यांना मिळाली पाहिजे, असंही अतुल भातखळकर यांनी म्हटले होते.
हे ही वाचा :
नागपूर अधिवेशनापर्यंत जयंत पाटील यांचे निलंबन
भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन
२२ डिसेंबर राष्ट्रीय गणितज्ञ दिवस
लग्नासाठी मुलगी द्या, म्हणत सोलापुरात तरुणांचे आंदोलन
दरम्यान, हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये अध्यक्षांसाठी अपशब्द वापरले. त्यामुळे अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांनी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला. यावेळी विरोधापक्षनेते अजित पवार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.