महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रोज महाराष्ट्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मंगळवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारच्या भ्रष्ट आणि बेकायदेशीर व्यवहारांवर निशाणा साधला. या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्राच्या गृहखात्यातील गैरव्यवहार हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यात तासभर चर्चा झाली. या बैठकीवर प्रतिक्रिया देताना भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक महत्वाची कागदपत्र पत्रकारांसमोर मांडली आणि ६.३ जीबीचा डेटा आपल्याकडे असल्याचा दावाही त्यांनी केला. याशिवाय पत्रकार परिषद झाल्यावर हा डेटा घेऊन दिल्लीला केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या डेटामधून त्यांनी फोन टॅपिंग आणि त्यातून होणारा बदल्यांचा भ्रष्टाचार उघड होत असल्याचेही सांगितले. हे पुरावे घेऊन फडणवीस आज दिल्लीत जाऊन गृह सचिवांना भेटले आणि या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. या नंतर मंगळवारी रात्री गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यात अंदाजे तासभर चर्चा झाली.
हे ही वाचा:
बेअब्रु सरकार, रया गेलेले पवार
अमित शहांकडे आहेत आणखी काही लेटर बॉम्ब
भाजपाच्या आरोपांना उत्तरे द्या नवाब मलिक, भ्रमिष्टा सारखे बोलू नका
‘पेन ड्राईव्ह’ घेऊन फडणवीस दिल्लीत
याच भेटीवर प्रतिक्रिया देताना भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर म्हणाले, “आपण दाबलेला रिपोर्ट फडणवीसांनी बाहेर कसा काढला यावर मुख्यमंत्री – गृहमंत्र्यांची चर्चा झाली असावी. आमच्या हातात रिपोर्ट आहे. त्याच्यात डिटेल्स आहेत. त्यामुळे ते दोघेही घाबरले असावेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीही आरोप केले असले तरी सत्य काय आहे हे या दोघांना माहित आहे. त्यांच्याच काळात एसीएस होमच्या सहीने हे टॅपिंग झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी हे संभाषण ऐकले आहे. तरीही मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही. त्यामुळे सर्वच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला तर काय करायचे यामुळे ते चिंतेत आहेत. म्हणूनच ही भेट असावी.” असे भातखळकर म्हणाले.