आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

भारताने आज कोरोना विरुद्धच्या लढाईत ऐतिहासिक कामगिरी करत आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. केवळ २७३ दिवसांत भारताने हा टप्पा पार करून विश्वविक्रम केला आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या वतीने कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला.

कांदिवली पूर्व येथील कामगार रुग्णालय लसीकरण केंद्र येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात १०३ कोरोना योद्धे व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ‘भारताने १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार करत एक नवा इतिहास रचून जगभरात डंका वाजवला आहे, यातून ‘मोदी है तो मुमकिन है’ हे संपूर्ण जगाने पुन्हा एकदा अनुभवले असल्याचे मत आमदार अतुल भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केले. तर यावेळी १०० फुगे आकाशात सोडत सर्वांनी हा सुवर्णक्षण साजरा केला.

हे ही वाचा:

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

लसीकरणाच्या ऐतिहासिक क्षणाला १०० वारसा स्थळांना चढणार तिरंग्याचा साज!

कोरोनामुळे संपूर्ण जग भयभीत झाले असताना सुद्धा नरेंद्र मोदी यांनी आपली कार्यकुशलता दाखवत एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केले, २ लाख कोटी रुपयांची गरीब कल्याण योजना जाहीर करून ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देत उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही असा सर्व भारतीयांना विश्वास देणे असो किंवा २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत समाजातील प्रत्येक घटकाला कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी केलेली मदत असो, अत्यंत कमी काळात देशभर आरोग्य सुविधा उभारणे असो किंवा शास्त्रज्ञ व डॉक्टरांना आर्थिक व प्रशासकीय मदत देत केवळ ४ महिन्यांच्या काळात लस शोधणे असो, मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला कोरोना महामारीतून सुखरूप बाहेर पाडण्याचे काम केले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत भारताची लस उत्पादन क्षमता २०० कोटी इतकी होणार आहे त्यामुळे भारतात संपूर्णपणे लसीकरण पूर्ण होण्यासोबतच जगातील १५० देशांना भारत लसींचा पुरवठा करणार असल्याचा विश्वास सुद्धा आ. भातखळकर यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

यावेळी कामगार हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नायर, डॉ. छेडा, नगरसेविका सुनिता यादव, भाजपा पदाधिकारी राणी द्विवेदी, आप्पा बेलवलकर, सुधीर शिंदे, नितिन चौहान, रवी विश्वकर्मा व अनेक ज्येष्ठ पत्रकार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Exit mobile version